धक्कादायक : दारू पकडल्याची बातमी प्रकाशित केली म्हणून पत्रकारास जीवाने मारण्याची धमकी …….

0
25
1

आरोपीच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल.

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गजानन पोटदुखे

दिनांक :-30 जानेवारी 2024

देवळी येथील अथर्व भोजनालय मध्ये पोलिसांनी धाड टाकून दारू जप्त केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे न्यूज प्रभात डिजिटल मीडिया महाराष्ट्रराज्य यांनी यासंदर्भात बातमी प्रकाशित केली होती .दारू पकडण्याची बातमी का प्रसिद्ध केली म्हणून आरोपी जगन वैद्य व त्यांची पत्नी निर्मला जगन वैद्य यांनी न्यूज प्रभात डिजिटल मीडिया चैनल चे वर्धा जिल्हा प्रतिनिधी गजानन पोटदुखे यांना त्यांच्या देवळी येथील उपहारगृहात जाऊन त्यांना अश्लील शब्दात शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. पत्रकारांवर झालेल्या हल्ल्यामुळे शहरा मध्ये एक प्रकारे दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे . पत्रकार गजानन पोटदुखे यांनी भीतीपोटी देवळी पोलीस स्टेशनला आपल्यावर झालेल्या हल्ल्याची व घटनेची तक्रार नोंदविली असून या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे. ठाणेदार भानुदास पिदुरकर यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपीं जगन वैद्य व त्यांची पत्नी निर्मला वैद्य यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.

पत्रकार गजानन पोटदुखे यांच्यावर झालेला हल्ला निंदनीय असून यांची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. देवळी शहरांमध्ये दारू विक्रेत्यांचे हौसले बुलंद झाल्याचे दिसत आहे. देवळी मध्ये दारू विक्रीचे प्रमाण वाढले असून दिवसेंदिवस दारू विक्रेत्यांचे हिम्मत वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे सर्व सामान्य माणूस दहशती मध्ये आहे .तुम्ही आमच्या विरोधामध्ये कोणी तक्रार करू नये किंवा वर्तमानपत्रात बातमी प्रकाशित करू नये ही भावना ठेवून ते दहशतीचे वातावरण देवळी शहरात पसरवीत आहे. पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन देवळी मध्ये निर्भय वातावरण निर्माण व्हावे, दहशतीचे वातावरण निर्मित करणाऱ्यांना त्यांचा चोख बंदोबस्त करावा अशी नागरिकांची मागणी आहे.