सालेकसा / मायकल मेश्राम
लोकजागृती व ग्रामोत्थान ह्या उद्देशाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सालेकसा नगर पंचायत क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या हल्बीटोला गावात राष्ट्रीय समाज प्रबोधनकार मा. सत्यपाल महाराज यांचे शिष्य सप्तखंजरी वादक इंजिनिअर उदयपाल वणिकर महाराज यांचा तुफानी विनोदी समाज प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. ज्याच्या मध्ये सामाजिक समता, स्वच्छता, जाती भेद न करण्याकरीता, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, राष्ट्र माता जिजाऊ, छत्रपति शिवाजी महाराजांच्या, डॉ.बाबा साहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्री बाई फुले, आणि अन्य संत, महापूरूष यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आले.
आयोजित कार्यक्रमाला महापुरूषांच्या प्रतिमेला पुष्पहार,दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात कऱण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान माजी जिल्हा परिषद सदस्य दुर्गा तिराले यांनी भुसविले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य अर्चना मडावी ,भाजपा तालुका महामंत्री राजेंद्र बडोले,राष्ट्रवादी तालुका शहर अध्यक्ष ब्रजभूषण बैस , तालुका अध्यक्ष युवक राष्ट्रवादी कांग्रेस मायकल मेश्राम , शालिनी बडोले, माजी सरपंच सुरेश शेंडे ,विनोद वैद्य,पिंकी दीदी पांडे,अध्यक्ष मुस्कान हेल्प फाउंडेशन सीमाताई बैस,उद्योजक संदीप अग्रवाल, सचिन बहेकार, निलेश बोहरे, मनोज कोटांगले, वैभव हेमने,विद्याताई बोहरे, जितू शेंडे, राजकुमार चुटे, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या प्रबोधन कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी बाजीराव तरोने, ललित किरसान,प्रमोद राऊत,गौरीशंकर भांडारकर , महेश चौधरी , तोमेश्वर किरसान व नागरिकांनी सहकार्य केले.

