संघी परिवार गोंदिया तर्फे आमगांव तालुक्यातुन प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना दरवर्षी संघी टॉपर्स अवार्डने गौरविण्यात येते, यावर्षी देखील या पुरस्काराचे वितरण शिक्षण महर्षी लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांच्या जयंती निमित्त ४ फेबबारी २०२४ रोज रविवारला आदर्श कनिष्ठ महाविद्यालय, आमगांव येथे आयोजीत करण्यात आले आहे.
यावेळी प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. संघी टॉपर्स अवार्ड साठी श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टीटयुट ऑफ फार्मसी, आमगांव. मधुन कु. सिद्धी अर्जुन चौधरी, या विद्यार्थीनीने ७७.७३ टक्के गुण मिळवुन प्रथम क्रं. प्राप्त केला. श्री लक्ष्मणराव मानकर कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड. आमगांव. मधुन निलिमा महेंद्र मेश्राम या विद्यार्थीनीने ७९.७२ टक्के गुण मिळवून प्रथम क्रं. प्राप्त केला. डी.टि. एड. मधुन कु. सोनाली दिंगबर तुरकर या विद्यार्थीनीने ८२.७५ टक्के गुण मिळवुन प्रथम क्रमांक तसेच श्री लक्ष्मणराव मानकर प्रायवेट आय.टी.आय. मधुन इलेक्ट्रीकल शाखेतुन विजय रोशन नागरीकर यानी ९२.६६ टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केला. श्री लक्ष्मणराव मानकर कॉलेज ऑफ पॉलीटेक्नीक मधुन कु. प्रिया भोजलाल ठाकरे ८४.७३ टक्के, आदर्श कनिष्ठ महविद्यालय, येथील १२ वी ची विद्यार्थी आयुष विजयकुमार डोंगरे, याने तालुक्यातुन ९५.१७ टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळविला. त्याच प्रमाणे १० वी मधुन आदर्श विद्यालयची कु. विशाखा हुमेंद्र रहांगडाले, ९६.८० प्रथम क्रमांक पटकाविला, व भवभूति महाविद्यालयातुन बी. एस्सी. मधुन कु. निखिता आर पटले याने ७१.८१ टक्के मिळवुन प्रथम क्रमांक, प्राप्त केला. या सर्व विद्यार्थ्यांना ०४ फेब्रुवारी रोजी शिक्षण महर्षी श्री लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारंभात संघी टॉपर्स अबार्ड स्मृती चिन्ह प्रमाणपत्र पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांनी उपस्थित रहावे. असे आवाहन श्री केशवराव एल. मानकर, सचिव भवभूति शिक्षण संस्था, आमगांव. श्री सुरेशबाबु असाटी, अध्यक्ष भवभूति शिक्षण संस्था, आमगांब. ब श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टीट्युट ऑफ फार्मसी, आमगांव, चे प्राचार्य डॉ. डी. के. संघी यांनी केले आहे.