दरवर्षीप्रमाणे भवभूति शिक्षण संस्थेचे संस्थापक श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोहाचे रविवार ४ फेब्रुवारीला दुपारी १२.००वाजता स्थानिक आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे आयोजन करण्यात आले आहे. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रा संजय भेंडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारोहाचे उद्घाटन माजी विधान परिषद सदस्य गिरीश व्यास यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रामुख्याने अशोक नेते, खासदार गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र व विजय रहांगडाले,आमदार तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्र हे उपस्थित राहणार आहेत. गुरुजी जयंती समारोहाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या सेवावृतींचा याप्रसंगी सत्कार करण्यात येतो. यावेळी अशोक अग्रवाल, अध्यक्ष राईस मिल असोसिएशन गोंदिया, विजयजीत सिंह वालिया, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ता गोंदिया, उल्हास फडके, सदस्य शिक्षक आघाडी भाजपा महाराष्ट्र राज्य, जितेंद्र भाऊ मेंढे, माजी जिल्हा परिषद सदस्य गोंदिया तथा रोशनलाल मेश्राम सामाजिक कार्यकर्ता फुक्कीमेटा आमगाव यांचा अतिथींच्या हस्ते ते सत्कार करण्यात येणार आहे. श्रद्धेय गुरुजी यांना आपली श्रद्धा सुमने अर्पण करण्यासाठी परिसरातील जनतेने या समारोहाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे सप्रेम निमंत्रण संस्थेचे अध्यक्ष सुरेश बाबू असाटी, उपाध्यक्ष प्रमोद कटकवार व सचिव केशवराव मानकर तथा समारोह संयोजक प्राचार्य डी एम राऊत यांनी दिलं आहे.