आपला विदर्भ

घरकुल योजनेचा अंतिम (चौथा) हप्तासाठी घरकुलधारक प्रतीक्षेत

मनोज गोरे
कोरपना प्रतिनिधी मो.९९२३३५८९७०

गडचांदूर नगर परिषद अंतर्गत शहरातील 200 ते 250 लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले आहे. सदर लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना शहरी (घरकुल) योजनेचा अंतिम (चौथा) हप्ता नगरपरिषद मार्फत अद्याप वितरित करण्यात आलेला नाही. त्यामुळे शहरातील गोर गरीब लाभार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे घरकुल योजनेचे नगरपरिषद मधील जे शिल्लक अनुदान आहे त्यामधून लाभार्थ्यांना अंतिम (चौथा) हप्ता तात्काळ वितरित करून लाभार्थ्यांची होणारी गैरसोय थांबवावी अशी मागणी घरकुल लाभार्थी करीत आहे. सदर आमदारानी तात्काळ दखल घेऊन घरकुल लाभार्थ्यांना अंतिम (चौथा) हप्ता तात्काळ वितरित करणे बाबत नगरपरिषद गडचांदूर कडे याविषयी पाठपुरावा करून त्या घरकुल लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यात यावा अशी मागणी घरकुल लाभार्थ्यांनी केली जात आहेत तेव्हा याकडे आमदार लक्ष घालतील काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!