सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीस आजीवन कारावास

0
90

मा. श्री. एन.डी.खोसे, जिल्हा न्यायाधीश -२ व अति. सत्र न्यायाधीश, गोंदिया यांचे निर्णय

गोंदिया / धनराज भगत

आज दिनांक ३१/०१/२०२४ रोजी सत्र न्यायालय, गोंदिया यांनी खुनांच्या प्रकरणातील आरोपी नामे भरत मदनकर, वय ६२ वर्षे, रा. सौदंड ता. सडक/अर्जुनी जि. गोंदिया यांस भारतीय दंड विधानाचे कलम ३०२ अंतर्गत आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

सदर प्रकरण असे की, आरोपी भरत मदनकर वय ६२ वर्षे रा. सौदंड ता. सडक/अर्जुनी जि. गोंदिया याचा मृतक पंढरी धोंडू मदनकर वय ७२ वर्षे हा सख्खा भाऊ होता. आरोपी व मृतक यांचे शेत कुंटुबातील एकत्र जमिनीतुन आपसी हिस्से बटवा-याने झाले असल्याने ते एकमेकांच्या लगत होते. मूतक हे आरोपीला कधी कधी तो दारू पिवुन येत असल्यामुळे त्याला रागवत होते त्यामुळे आरोपी हा मृतक यांचा राग धरून चिड करित होता व त्यांचेशी बोलत नव्हता. त्याचाच राग मनात धरून दिनांक ०५/०६/२०१९ रोजी आरोपी याने मृतक पंढरी धोंडू मदनकर यास शेतावर एकटे पाहून कोणत्यातरी वजनी शस्त्राने डोक्यावर वार करून त्यास जिवाणीशी ठार केले होते.
त्यानंतर दिनांक ०५/०६/२०१९ रोजी सुमारे ०२:३० वाजता च्या दरम्यान मृतकाची पत्नी सौ. सुमित्रा मदनकर ही शेतावर गेली व सुमारे ४.०० वाजताच्या दरम्यान घरी परत आली तेव्हा तीने फिर्यादीचे लहान भाऊ एकनाथ यास सांगितले की मृतक पंढरी मदनकर हे जमिनीवर पडलेले असुन त्यांचा डोक्याला मोठी जखम होऊन त्यांचा मेंदू बाहेर आलेला आहे. सदर घटनेची माहिती फिर्यादीचे लहान भाऊ एकनाथ याने फिर्यादी यास फोनवर दिली होती. तेव्हा फिर्यादी यांनी शेतावर जावून पाहिले असता मृतक हे शेतावरील झोपडीमध्ये जमिनीवर मृत अवस्थेत आढळून आले व त्यांच्या बाजूला आरोपी भरत मदनकर यांचा नेहमी वापरत असलेला टॉवेल पडलेला दिसला. यावरून आरोपी भरत मदनकर याने जुना राग मनात धरून कोणत्यातरी वजनी शस्त्राने मृतक पंढरी मदनकर यांच्या डोक्यावर वार करून त्यास जिवाणीशी ठार केले आहे असा फिर्यादीचा संशय झाला यावरून फिर्यादी किशोर पंढरी मदनकर याने दिनांक ०५/०६/२०१९ रोजी आरोपी वरील संशयावरून आरोपीविरूध्द पोलीस स्टेशन डुग्गीपार, जि. गोंदिया येथे फिर्याद दिली होती. त्या आधारावर आरोपीविरूध्द कलम ३०२ भा.द.वि. अंतर्गत गुन्हा नोंदवून तत्कालीन पोलीस निरिक्षक विजय पवार पो.स्टे. डुग्गीपार, यांनी घटनेचा सविस्तर तपास करून आरोपीविरूध्द न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते.
सदर प्रकरणात आरोपीविरूध्द दोष सिध्द करण्यासाठी सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता  महेश एस. चंदवानी यांनी एकुण ११ साक्षदारांची साक्ष न्यायालयासमोर नोंदवून घेतली.
एकंदरित आरोपीचे वकील व सरकारी वकील महेश चंदवानी यांचे सविस्तर युक्तीवादा नंतर तसेच कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय अहवाल या आधारावर मा. एन. डी. खोसे, जिल्हा न्यायाधीश-२ व अति. सत्र न्यायाधीश, गोंदिया जि. गोंदिया यांनी आरोपीविरूध्द सरकारी पक्षाचा पुरावा ग्राहय धरून आरोपीला भा. द. वी चे कलम ३०२ अतंर्गत आजन्म सश्रम कारावास व २०००/- रूपये दंड व दंड न भरल्यास ३ महिन्याचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली
सदर प्रकरणात जिल्हा पोलीस अधिक्षक मा. निखिल पिंगळे यांच्या मा पोलीस निरिक्षक विजय पवार पो.स्टे. डुग्गीपार यांचे देखरेखीत पैरवी कर्मचारी चौधरी, पो.ह.वा. पो.स्टे. डुग्गीपार यांनी उत्कृष्ट काम पाहिले.
Previous articleघरकुल योजनेचा अंतिम (चौथा) हप्तासाठी घरकुलधारक प्रतीक्षेत
Next articleयोग्य प्रतिनिधीची निवड केल्याने विकास सुद्धा झपाट्याने होतो ; पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार