आपला विदर्भ

योग्य प्रतिनिधीची निवड केल्याने विकास सुद्धा झपाट्याने होतो ; पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गजानन पोटदुखे

नगर परिषद, देवळी अंतर्गत वीस कोटी खर्चाच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा.

देवळीः प्रथमत : भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याला स्वतः उपस्थित न राहण्याची खंत व्यक्त मा. नाम. सुधीर मुनगट्टीवार यांनी व्यक्त केली.योग्य प्रतिनिधीची निवड केल्याने विकास सुद्धा झपाट्याने होतो, याची प्रचिती खास तडस यांचे माध्यमातून येत असल्याचे विचार त्यांनी व्यक्त केले. महायुतीच्या काळात सेवाग्राम विकास आराखडा तसेच अनेक योजना या जिल्ह्यात कार्यान्वित केल्या असल्याचे यावेळी राज्याचे मंत्री नाम. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

ते केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत देवळी नगरपरिषद पाणीपुरवठा प्रकल्प (अंदाजपत्रकिय किंमत रू रु. 19.06 कोटी) कामाचा भुमीपूजन साहित्यरत्न लोकशाहीर अणाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना सन 2022-23 अंतर्गत देवळी प्रभाग क्र.3 (खाडे लेआऊट) ओपन स्पेस परीसर सौदर्यीकरण लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटक म्हणुन बोलत होते.

देवळी नगर परिषद अंतर्गत विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा राज्याचे मंत्री तथा पालकमंत्री नाम सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते मुंबईच्या कार्यालयातून ऑनलाइन संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस हे होते, तर अतिथी म्हणून आमदार पंकज भोयर, भाजपचे जिल्हा अध्यक्ष सुनील गफाट, भाजपचे माजी प्रदेश सचिव राजेश बकाने, नप प्रशासक स्वप्नील सोनवणे, न.प.मुख्याधिकारी सौरभ कावळे व माजी नगराध्यक्ष शोभा तडस यांची उपस्थिती होती.

कांग्रेसच्या काळात मतदारसंघ विकासापासून कोसो दूर गेला होता, परंतु मागील 10 वर्षात वर्धा लोकसभा क्षेत्रात मोठया प्रमाणात विकास झालेला आहे, त्याचप्रमाणे देवळी विधानसभा क्षेत्रात सुध्दा आता बदल करण आवश्यक आहे व नवीन नेतृत्वाला संधी देण्यासाठी राजकीय परिवर्तन आवश्यक झाले असल्याचे विचार अध्यक्षीय भाषणात खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.

error: Content is protected !!