आमगांव पोलीस ठाण्यांतर्गत मौजा चिरचाळबांध येथील रहिवासी अंकुश शामदास हिरकणे, रिसामा येथील कमलेशकुमार आशाराम तुमसरे ,ठाणा येथील विनोद ग्यानीराम गणवीर, गोंदिया रिंगरोड येथील नुपूर रमेश रहांगडाले यांचा मोबाईल बेपत्ता झाला होता.
पोलिसांनी पोर्टलद्वारे शोध घेतला आणि रेडमी 10S, इन्फिनिक्स कंपनीचे 2 मोबाईल, ओप्पो ए 13, रेडमी 12 प्रो. असे 5 हरवलेले मोबाईल जप्त केले आणि ज्यांचे मोबाईल तिथे होते त्यांना परत केले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक – गणपत धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार – दसरे, पोलीस हवालदार साबळे आणि कठाणे यांनी मोबाईल फोन पोर्टलवर शोध घेऊन अथक परिश्रम घेतले.
हरवलेले मोबाईल सापडल्याने तक्रारदारांनी पोलिसांप्रती आनंद व्यक्त केला आहे.