कमलापूर येथे समक्का सारक्का देवीची यात्रा

0
21
1

गडचिरोली /रामू मादेशी

कमलापूर येथे समक्का सारक्का देवीच्या जत्रेत उसळणार भाविकांची गर्दी. कमलापूर-आदिवासीं बांधवांच्या आराध्य दैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवी समक्का सारक्का तेलंगाना राज्यातील मुलुगु जिल्ह्यात फार मोठे देवीची जत्रा भरते सदर जत्रा कुंभमेळ्यानंतर दुसरा क्रमांक लागतो तर तेलंगाना राज्यात प्रथम क्रमांक लागतो सदर जत्रेमध्ये तेलंगाना आंध्र प्रदेश महाराष्ट्र छत्तीसगड यासह अन्य राज्यातील भाविक जत्रेत दाखल होत असतात परंतु काही नागरिक काही कारणास्तव त्या ठिकाणी जाऊ शकत नाही कमलापूर परिसरात आदिवासी बांधव तसेच तेलगू भाषिक लोक भरपूर प्रमाणात असून या भागातील लोकांना देवीचे दर्शन व्हावे पूजा अर्चना व्हावे भक्तांचे मनोकामना पूर्ण व्हावे याकरिता कमलापूर येथे गेल्या अनेक वर्षापासून दर दोन वर्षांनी जत्र भरविले जाते सदर जत्रा देवीच्या मंदिर परिसरात भरते यामुळे सदर जत्रेत हजारोंच्या संख्येने मोठा उत्साहात व आनंदात सहभागी होऊन पूजाअर्चा केली जाते भक्तांना सोयी सुविधा उत्तम व्हावे याकरिता दरवर्षी थोडे थोडे मंदिराचे सुशोभीकरण मंदिर बांधकाम विस्तार अनेक सोयी सुविधा पुरविण्याचे प्रयत्न मंडळाचे पदाधिकारी करीत आहेत यंदा देखील 21 फेब्रुवारी व 22 फेब्रुवारी या दोन दिवस जत्रेचे मोठे आयोजन करण्यात येत आहे त्यासाठी महिनाभरापासूनच जयत तयारीला सुरुवात करण्यात आली आहे सदर जत्रेत पूजा अर्चना सोबतच विविध सामाजिक उपक्रम सुद्धा राबविले जाते यामुळे परिसरातील भक्तगण आकर्षित होत असतात शिवाय सदर जत्रेत जिल्ह्यातील राजकीय नेते आजी-माजी सर्वच हजेरी लावून देवीचे पूजन करीत असतात अनेक दुकाने सुद्धा गजबजुन सजलेले दिसतात 21 फेब्रुवारीला सारक्का देवीचे आगमन पुजा व सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम रात्री भजन कीर्तन २२ फेब्रुवारीला संमक्का देवीचे आगमन कंकावनम बोनालु महाप्रसाद रात्री आदिवासी पारंपारिक सामूहिक नृत्य आदि कार्यक्रम केले जाते विशेष म्हणजे शासकीय योजनांचे स्टाल सुद्धा लावण्यात येते विशेष बाब म्हणजे कमलापूर येथे शासकीय हत्ती कॅम्प असून अनेक बाहेरील भाविकांना देवीचे दर्शन व पर्यवेश दर्शन होतो यानिमित्ताने सुद्धा भाविकांची संख्या दर जत्रेला वाढत आहे या सर्व बाबीचा योग्य नियोजन करून जत्रेची मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आयोजक मंडळ व्यस्त असून जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित रहावे असे आव्हान देखील मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी केले आहे.