…ही सेवानिवृति नसून नवीन आवृत्तिची सुरुवात आहे – एन.एन.येळे

0
20
1

गोंदिया / धनराज भगत

आदिवासी विकास हायस्कूल व कला कनिष्ठ महाविद्यालय खजरी (डोंग.)येथील सहाय्यक शिक्षक  जे.आर.कटरे  दि.31/1/2024 रोज बुधवारला नियत वयोमानानुसार सेवानिवृत झाले. जे.आर.कटरे यांच्या सेवानिवृत्तिपर सत्कार व निरोप समारंभांच्या अध्यक्षस्थानावरुंन जगत कल्याण शिक्षण संस्थेचे सचिव मा. एन. एन. येडे  यांनी जे.आर.कटरे  यांची ही सेवानिवृत्ति नसून नवीन आवृत्तिची सुरुवात आहे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन करुन सरस्वती माता व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन करण्यात आली.कार्यक्रमाला विशेष अतिथि म्हणून सेवानिवृत प्राचार्य मा. के. बी.कटरे ,मंचावर प्रमुख अतिथि म्हणून विद्यमान प्राचार्य मा. आर.के.कटरे ,सत्कार मुर्ती  जे.आर.कटरे व त्यांच्या धर्मपत्नी सौ.खेलनबाई कटरे,खजरी येथील पोलिस पाटील  इन्द्रराजबापू राउत,शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष  सुदामजी झिंगरे,सेवानिवृत स.शिक्षक  जी.टी.लंजे,पर्यवेक्षक डी. डी. रहांगडाले,सेवानिवृत प्र. प. आर.यू.गौतम,सेवानिवृत परिचर जी.एम.मानकर,धानोरी येथील उपसरपंच  केदार गौतम होते.
विशेष अतिथि  के.बी.कटरे सर यांनी  जे.आर.कटरे सर यांच्या सेवाकार्यावर प्रकाश टाकून आदिवासी विकास हायस्कूल व कनिष्ट महाविद्यालय खजरी ला प्रगतिपथावर कार्यरत ठेवण्याकरीता सर्वोतोपरि सहकार्य करणार तसेच या शाळेकरिता अहोरात्र झटले असून आजही तेवढेच प्रेम आहे असे संबोधित केले.
 सेवानिवृत्त होत असलेले जे.आर.कटरे सर यांचे सपत्नीक भेटवस्तू ,शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार वाय. टी.परशुरामकर सर यांनी मानले तर संचालन एस. जे.रामटेके सर यांनी केले.
कार्यक्रमाला आदिवासी विकास हायस्कुल व कनिष्ट महाविद्यालय खजरी(डोंग.)चे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.