गोंदिया / धनराज भगत
आधुनिक औद्योगीकरण व स्पर्धेच्या युगात बालकांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष पुरविले जाते पण बालपणात आवश्यक असलेल्या खेळांकडे दुर्लक्ष होताना दिसून येते, तसेच समाजात शेवटच्या घटकातील अनेक अबाल वृद्ध आवश्यक गरजांपासून वंचित असलेले दिसून येतात या दोन्ही बाबींची प्रकर्षाने जाणीव होऊन कर्तव्या सोबतच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मदतीचा हात आपण पुढे केला पाहिजे हे भाव मनात आणून केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मान. सोमनाथ कदम हे बालकांना प्रोत्साहित करण्यासाठी व अबाल वृद्धांच्या सेवेसाठी तसेच युवक,महिला, पुरुष व शेतकऱ्यांसाठी नेहमी पुढे येतात. त्यामुळे ते कोवळ्या मनापासून अबाल वृद्धापर्यंतचे आधार ठरले.
राष्ट्रपिता महात्मा गांधीजी च्या पुण्यतिथी चे औचित्य साधून परिसरात सुरू असलेल्या अतिशय थंडीच्या गारव्यामुळे होणाऱ्या त्रासाला ओळखून पन्नास ज्येष्ठ नागरिकांना ब्लॅंकेट चे वाटप करून इथेच थांबले नाही तर 25 गरजवंत विद्यार्थ्यांनाही स्वेटरचे वाटप केले.
एक दिवस चिमुकल्या सोबत ह्या उपक्रमांतर्गत “गुड टच, बँड टच” व मोबाईल मुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत हितगुज करून चिमुकल्या विद्यार्थ्यांसी संवाद साधला. तसेच पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्व खेळांचे साहित्य भेट दिले. भारावून गेलेल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचे स्मित हास्य बघून अतिशय आनंद झाल्याचे परिसरातील जनतेने जवळून अनुभवले . या नि:स्वार्थ कार्याची कदम साहेबांचे, तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्व मनापासून कौतुक करीत आहेत.
सदर उपक्रम मान.निखिल पिंगळे पोलीस अधीक्षक, मान. नित्यानंद झा अप्पर पोलीस अधीक्षक, आणि मान.संकेत देवळेकर उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी यांच्या मार्गदर्शनाखाली केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मान. सोमनाथ कदम साहेब यांच्या पुढाकाराने पो. उपनि. प्रताप बाजड, पोउपनी भोडे, चंद्रकांत भोयर ,सुशील रामटेके ,पूनम हरिणखेडे मीना चांदेवार ,खुशाल बागडकर यांच्या सहकार्याने राबविण्यात आले.