गोंदिया / धनराज भगत
आमगाव स्थानिक भवभूती शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वर्गीय श्री लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांची जयंती येत्या ४ फेब्रुवारी ला साजरी करण्यात येत आहे. जयंतीनिमित्ताने श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे सहयोग सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी दहा वाजेपासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आव्हान संस्थेचे संचालक केशवराव मानकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.के. संघी यांनी केले आहे.

