न्यूजप्रभात वृत्तसेवा
मकर संक्रांतीचे औचित्य साधून महिला बाल कल्याण व महिला आघाडी च्या वतीने महिला मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रम गायत्री मंदिर सभागृहात उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला व बालकल्याण सभापती सविता ताई पुराम, प्रमुख अतिथी म्हणून स्नेहा मानकर, महिला आघाडी अध्यक्ष सुषमा ताई भुजाडे, नंदा पारवे, मयुरी वैरागडे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविकातुन सविता पुराम यांनी महिला सक्षमीकरणासाठी तसेच महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर असल्याचे सांगितले, हळदी कुंकू आणि वानाचा कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

