दि. ३ फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय क्षत्रिय पोवार महासंघ द्वारा तुमसर येथे दुसरे अधिवेशन पार पडले. सदर अधिवेशनात पोवार समाजातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी न्यूज प्रभात डिजिटल नेटवर्क चे संपादक धनराज भगत यांना उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. डॉ. सौरभ पारधी (कलेक्टर सूरत )गुजरात यांच्या हस्ते ‘सामाजिक सेवा सन्मान’ देण्यात आला.
यावेळी सदर कार्यक्रमाला ऋषि बिसेन(IRS),विशाल बिसेन, इंजि.नरेश गौतम भोपाल, से.नि.प्राचार्य खुशाल कटरे,इंजि. गोवर्धन बिसेन,ऋषिकेश गौतम रोशनकुमार रहांगडाले आदि मान्यवर उपस्थित होते.