वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गजानन पोटदुखे
दिनांक :-4 फेब्रुवारी 2023
देवळी : स्थानिक सृजन इंग्लिश मिडीयम स्कूल देवळी येथे दि.1 फ़रवरी ते दि.3 फ़रवरी दरम्यान 4 था स्काऊट गाईड मेळावा घेण्यात आला. सदर मेळाव्यात इयत्ता 6 वी ते 9 वी च्या विद्यार्थ्यानी भाग घेतला त्यात मा. संस्था अध्यक्ष डॉ.श्रद्धा चोरे मॅडम यांच्या हस्ते सदर मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. गाईड नी या मेळाव्यात तंबू बांधणी,वेगवेगळे ग्यज़ेट, शोभायात्रा, शेकोटी कार्यक्रम, बिना भानडयाचा स्वयंपाक करीत सर्वांचे लक्ष वेधले तसेच मागिल महिन्यात झालेल्या वर्धा जिल्हा स्काऊट गाईड मेळाव्याचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. विद्यार्थ्यानी केलेल्या कृतीचे त्यातून घेतलेल्या स्वावलंबीपणाचे धडे यांचे पुनर्बांधणी आणि कौतुक करण्यात आले. यावेळी मा.संस्थाध्यक्षा डॉ.श्रद्धा चोरे मैडम, मा.संस्थासचिव डॉ.प्रशांत चव्हाण सर, मुख्याध्यापिका प्रिया वैद्य मैडम, उपमुख्याध्यापिका पल्लवी काळे मैडम, स्काऊट शिक्षक अनुप चिंचपाले गाईड शिक्षिका किर्ती कामडी,समिर भोयर सर, काठोके सर,शेंडे सर, मनोज बकाणे,मयुर राऊत तसेच मदतनीस हर्शल कैकाडी यांनी केले.