आपला विदर्भगोंदिया

गोरेगाव क्षेत्रात ७ कोटी ४० लक्ष विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

प्रतिनिधी /दीपक चौरागडे

तिरोडा:-तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांचा माध्यमातून विविध ठिकाणी विकास कामे मंजूर असून त्यापैकी ७ कोटी ४० लक्ष विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत तिमेझरी बोळुंदा रस्ता बांधकाम ३३१. ६१ लक्ष रुपये, हिरापुर मलपुरी रामाटोला पिंडकेपार रस्ता ३२६. १७ लक्ष, ठक्कर बाप्पा आदिवासी विकास योजनेअंतर्गत तिमेझरी येथे रस्ता नाली बांधकाम भुमिपुजन २० लक्ष रुपये. आसलपाणी येथे रस्ता व सभामंडप बांधकाम २० लक्ष रुपये , हिरापुर येथे समाजभवन बांधकाम भुमिपुजन एकुन निधी ५ लक्ष रुपये,मलपुरी अंतर्गत रामाटोला येथे सभामंडप व नाली बांधकाम भुमीपुजन. २७ लक्ष रुपये. , डव्वा येथे हनुमान मंदिराजवळ सभामंडप बांधकाम १० लक्ष रुपये कामांचा समावेश असून यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांचा दर्जा सुधारणार आहे. कार्यक्रमाला प्रामुख्याने मा.सभापती विजय राणे, उपसभापती राजकुमार यादव, जी.प.सदस्य लक्ष्मण भगत, शैलेश नंदेश्वर, चित्ररेखा चौधरी, प.स.सदस्य शीतल बिसेन, सुप्रिया गणवीर, मा.उपसभापती सुरेंद्र बिसेन सरपंच मडावी, देवेंद्र ठाकरे, धूरपता कटरे, सलीम खान पठान, सुरेंद्र मेंढे, सा.कार्यकर्ता प्रभाकर ढोमणे, गुड्डू कावडे, सुरेंद्र अंबुले, चंद्रप्रकाश अंबुले, ओमचंद पटले, टीबकाज कवास, दिलीप बोपचे, धुर्वराज टेंभरे, योगराज टेंभरे, देबिलाल तुरकर, रमेश बिसेन, गोविंद पटले , दुर्गा विठ्ठुले शेखर कटरे व गावकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!