विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय

0
49

गोंदिया / धनराज भगत

आमगाव येथील भवभूती शिक्षण संस्था यांच्या वतीने आज दिनांक ४ फेब्रुवारी ला श्रद्धेय श्री लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांची जयंती मोठ्या थाटामाटाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला अनुसरून श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आमगाव येथे दि. ३ फेब्रुवारीला भव्य आरोग्य विषयक जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, यादरम्यान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्थानिक जनतेचे आरोग्याला अनुसरून सर्वेक्षण करण्यात आले होते तसेच आज दिनांक ४ फेब्रुवारीला भव्य निशुल्क रोग निदान तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जवळपास २५० गावकऱ्यांनी लाभ घेतला व ५० रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले. शिबिराला यशस्वी करण्याकरिता सहयोग सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल गोंदिया व श्री साईनाथ ब्लड बँक नागपूर यांचे सहकार्य लाभले. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे सहसंचालक मान. ललितभाऊ मानकर, प्राचार्य डॉ. डि. के. संघी, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. तुलसीदास निंबेकर तसेच भवभूती शिक्षण संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
शिबिरा दरम्यान श्री ल. मानकर कॉलेज ऑफ पॉलीटेक्निक, के के हायस्कूल, श्री ल. मानकर डीएड, बीएड, प्रायव्हेट आयटीआय कॉलेज‌ व भवभूती महाविद्यालय यांची सहकार्य लाभले. शिबिराला सुरळीत पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी व डी. फार्म आणि बी. फार्मसीचे विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना घटक यांनी परिश्रम घेतले.

Previous articleइंजि. जयप्रकाश पटले यांना ‘सामाजिक सेवा सन्मान’
Next articleकलार समाज महिला समिती तिरोडा – गोरेगावच्या वतीने आयोजित “हळदी कुंकू” कार्यक्रम संपन्न