तिरोडा / पोमेश रहांगडाले
दि. 4/02/2024 ला , कलार समाज महिला समीती तिरोडा – गोरेगाव मार्फत समाज भगिनींन साठी “हळदी कुंकू” समारंभ दया हॉस्पिटल तिरोडा येथे आयोजित करण्यात आले होते. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पुढील पिढी घडविण्यासाठी महिलांनी दूरदृष्टी ठेवून एकत्रित राहणे गरजेचे असल्याचे मत डॉ कुमुद संदीप मेश्राम कलार समाज महिला अध्यक्ष तिरोडा गोरेगाव क्षेत्र यांच्या द्वारे प्रकट करण्यात आले. तर कलार समाजच्या महिला या समाज बांधणीत नेहमीच अग्रेसर असून त्यांनी समाज कारणा सोबतच राजकारणातही रस घेण्यास तय्यारी दर्शवावी असे मत कलार समाज च्या जिल्हा परिषद गोंदिया सदस्य श्रीमती छबू ताई उके यांनी मांडले.
कलार समाज गौरव असणाऱ्या कु. शिखा पीपलेवार dy Engineer PWD यांनी.. महिलांनी परिवार सदृढ करण्याकरिता आर्थिक नियोजन तसेच सहकार्यातून रोजगानिर्मिती कडे विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगितले. कलार समाजाच्या पंचायत समिती सदस्या श्रीमती वनिताजी भांडारकर ताई यांनी. मुलींच्या शिक्षण व संगोपन यावर विशेष भर दिल्यास कलार समाजच भविष्य अजून उज्ज्वल होण्यास मार्ग सुकर होण्याचं मत व्यक्त केले. प्रसिद्ध साहित्यकार श्रीमती संगीता ठलाल यांनी आपल्या साहित्यिक भाषणातून महिलांना आत्मनिर्भर होण्यास प्रवृत्त करण्यासारखे संबोधन करून समा बांधला.
कार्यक्रमाला कलार समाजतील 250 चा जवळ जवळ महिलांनी सहभाग घेतला आणि वान वितरण करण्यात आला. सौ पुष्पाताई भांडारकर , सौ खिमवता दखने या प्रामुख्याने उपस्थित होत्या. डॉ संदीप मेश्राम यांच्या विषेश सहकार्यामुळे कार्यक्रमास खुप मदत झाली , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिंकेपार चे सरपंच श्रीमती भारती ताइ झगेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ पूजा मेश्राम यांनी केले.खालील नमुद नावांच्या 10 दिवसांच्या खुप मेहनतीमुळे व फालोअप मुळे व समाजातील नवेझरी , पींकेपार ,घोगरा , पाटील टोला , सुकडी , मुंडी कोटा,नहरटोला , काचे्वानी , बेरडीपार ,मांडवी ,तिरोडा ,वडेगाव ,इंदोरा , गिरोली , चुरडी व संपूर्ण तिरोडा तालुक्यातील महिलांच्या विषेश सहयोगाने व संपुर्ण कलार समाजातील सन्माननीय लोकांच्या विषेश सहकार्यामुळे व आशीर्वादाने हा इतका मोठा कार्यक्रम यशस्वी झाला.
येणारया काळात तिरोडा गोरेगाव तालुक्यातील लोकांची जनगनना करणे व त्यांच्या आर्थिक, सामाजिक हक्कांसाठी महिला समीती सदैव समोर असेल सौ.रक्षा उके गोंदिया, मार्गदर्शक डा.कुमुद मेश्राम तिरोडा , अध्यक्ष सौ.वनीता भांडारकर उपाध्यक्ष मुंडी कोटा (पं.स तिरोडा),सौ.शवेता मानकर उपाध्यक्ष तिरोडा (नगर परिषद सदस्य तिरोडा),
सौ.नंदीनी झेगेकर उपाध्यक्ष पींकेपार ,सौ.जयोती मेश्राम सचीव तिरोडा ,सौ.रौशनी मेश्राम सचीव मांडवी (पोलीस पाटील), सौ.पुजा शेंडे सदस्य चुरडी,सौ.सुनीता बावनथडे सदस्य नवेझरी,सौ.प्रीती भांडारकर सदस्य पाटीलटोला (सरपंच पाटीलटोला),सौ.प्रतीभा मेश्राम सदस्य,सौ.प्रीती कावळे सदस्य नहरटोला (सरपंच नहरटोला),कार्यक्रमास वेळेत वेळ काढुन उपस्थीत झाल्या बद्दल सगळ्यांचे आभार.
आयोजक पिंटु उके व समस्त सर्व वर्गीय कलार समाज महिला समीती तिरोडा गोरेगाव क्षेत्र.