आपला विदर्भगोंदिया

रजनीताई गभने यांची तेली समाज महिला शहर अध्यक्ष पदी सर्वानुमते निवड

तेली समाज महिला मेळाव्यात महिलांचा उत्कृष्ट प्रतिसाद.

जिला प्रतिनिधि माइकल मेश्राम

सालेकसा; शहर महिला आघाडी तर्फे आज रविवार रोजी तेली समाज महिला मंडळ मार्फत हळदी कुंकू आणि महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रामुख्याने उपस्थित सालेकसा तालुका अध्यक्ष मीनाताई हेमराज बावनकर उपस्थित होत्या. सर्व प्रथम संत जगनाडे महाराज आणि सावित्री बाई फुले यांचा प्रतीमेला माल्यार्पण आणि दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आले. अध्यक्षांच्या माध्यमाने उपस्थित महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. मराठी संस्कृतीचा भाग म्हणून आपल्या पतीचा नाव घेऊन कार्यक्रमात महिलांनी सहभाग घेतला. उपस्थित महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमाने नृत्य आणि गितगायन कार्यक्रमाचे सुद्धा सहभागी झाले होतें.

सालेकसा शहर महिला समितीचे गठण करण्यात आले. यात अध्यक्ष म्हणून रजनीताई गभणे, उपाध्यक्ष पदावर रत्नकला चकोले तर सचिव पदावर छायाताई गभने यांची निवड करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार देवश्री गभने यांनी केले.

error: Content is protected !!