गोंदिया/ धनराज भगत
एक सेवाव्रती समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे असा व्रत उराशी बाळगून संपूर्ण आयुष्य सकल समाजासाठी खर्च केले, आदिवासी भागात प्रतिकूल परिस्थितीत भगीरथ ज्ञानाची गंगा आणली, कोणतेही प्रलोभन नाही, सात्विक जिवन व साधे राहणे हाच जीवनाचा आधारस्तंभ मानून समाजाला दिशा देणारे खरे गुरूजी श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजींच्या रुपाने मिळाले. अशा व्यक्तीचे जीवन अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले असे मत भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
दरवर्षी प्रमाणे ४ फेब्रूवारी रोजी लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांची जयंती आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आमगाव येथे साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे उदघाटन माजी विधान परिषद सदस्य गिरिष व्यास नागपूर यांच्या हस्ते भाजपा प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी मंचावर माजी आमदार भेरसिंग नागपुरे, संजय पुराम,भाजपा गोदिंया जिला अध्यक्ष अँड येशुलाल उपराडे, संस्थेचे कार्यवाह माजी आमदार केशवराव मानकर, अध्यक्ष सुरेश बाबु असाटी, उपाध्यक्ष प्रमोद कटकवार, तज्ञ संचालक ढे. र. कटरे, संचालक हरिहर मानकर, रमेश कावळे, उर्मीला कावळे, लक्ष्मीबाई नागपुरे, ललीत मानकर, स्नेहा मानकर, समारोहाचे संयोजक प्राचार्य डि, एम, राऊत, व सर्व घटक संस्थेचे प्राचार्य गण उपस्थित होते.
उदघाटक गिरिष व्यास यांनी सामान्य माणसातुनच पुढे आलेले एक असामान्य व्यक्तीमत्व म्हणजे मानकर गुरुजी संघाच्याजडणघडणीतुन त्यांचे व्यक्तीमत्व फुलले संघाच्या तालमीतुन त्यांच्या जिवनाची वाटचाल झाल्या मुळे त्यांच्यात संघठन कौशल्य मुळे गुरुजींना यश आले राजकीय प्रवास खरतर संघटनात्मक कार्यात गेला यात त्यांनामोठे यश प्राप्त झाले असे म्हणाले.कार्यक्रमाची सुरुवात श्रद्बेय गुरुजींच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पांजली वाहून करण्यात आली. गुरुजींच्या कर्तुत्ववातुन प्रेरणा घेत समाजात, सामाजिक, शैक्षणिक कार्य पार पाडीत असे राईस मील असोसिएशनचे अध्यक्ष अशोक अग्रवाल, विजयसिंह वालिया, उल्हास फडके भंडारा, जितेंद्र भाऊ मेंढे तेढा, रोशनलाल मेश्राम, फागनलाल उके नागपुर यांना अतिथींच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृती चिन्ह देवुन सत्कार करण्यात आला तसेच शिक्षण क्षेत्रात नाव लौकिक केला अश्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.दरवर्षी संघी टॉपर गोदिंया च्या वतीने तालुक्यातील प्रथम प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आले. पुढे अध्यक्षीय भाषणात संजय भेंडे यांनी बिकट परिस्थितीत १९५० साली भवभुती शिक्षण संस्थेची स्थापना केली त्या वेळी अवघ्या २१ वर्षाचे होते त्यांनी भवभुती, रविंद्र, रामकृष्ण, आदर्श, असी शाळांना नावे दिली. त्यांचे राजकारण हे समाजासाठी होते जनसंघाच्या मंचावरून राजकारणाला सुरवात करणारे गुरुजी आमदार, खासदार, विधान परिषद सदस्य झाले. पक्ष संगठन मजबूत करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे कार्यवाह माजी आमदार केशवराव मानकर यांनी केले संस्थेत सुरु असलेल्या अनेक उपक्रमाची माहिती दिली, कार्यक्रमाचे संचालन ललीत लक्षणे, पुनम बिसेन, विद्या साखरे, यांनी केले तर आभार प्राचार्य डि, एम, राऊत यांनी मानले.
![](https://newsprabhat.in/wp-content/uploads/2024/08/IMG-20240726-WA0017-1.jpg)
![](https://newsprabhat.in/wp-content/uploads/2024/11/Screenshot_2024-11-29-14-09-27-68_99c04817c0de5652397fc8b56c3b3817.jpg</div> </div>
<footer>
<!-- post pagination --> <!-- review -->
<div class=)