आपला विदर्भगोंदिया

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पाठीशी घालणारे कोण? : सौरभ रोकडे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस गोंदिया यांचा युती शासनाला सवाल

न्यूजप्रभात वृत्तसेवा

गेल्या काही महिन्यांत राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. मात्र परिस्थिती जैसे थे असल्याचे दिसून येत आहे. पुण्यात दिवसाढवळ्या खुनाच्या घटना घडत आहेत, राज्याच्या उपराजधानी नागपुरातही कधी खून तर कधी गोळीबाराच्या घटना घडतात. गोंदिया शहरात रोजच गुन्हेगारी घटना घडत आहेत. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर शहरातील मुख्य रस्त्यावर निर्घृण हत्या करण्यात आली. महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये काल घडलेली गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आमदाराने पोलिसांसमोर गोळीबार करावा आणि तेही पोलिस ठाण्यात. महाराष्ट्रात यापूर्वी असे कधीच घडले नव्हते. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पाठीशी घालणारे कोण, असा मोठा प्रश्न आज राज्यातील तमाम सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. संतांची भूमी म्हटला जाणारा आपला महाराष्ट्र गुन्हेगारांचा अड्डा म्हणून ओळखला जाऊ नये, अशी भीती निर्माण झाली आहे असा सौरभ रोकडे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष गोंदिया यांचा युती शासनाला सवाल आहे.

error: Content is protected !!