गोंदिया / धनराज भगत
शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस, भवन रेलटोली, गोंदिया येथे माजी आमदार राजेंद्रजी जैन, विनोद हरिणखेडे व प्रेमकुमार रहांगडाले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
शिक्षा महर्षी स्वनाम धन्य नेता स्व. मनोहरभाई पटेल यांच्या जयंती निमित्त सुव्यवस्थित नियोजन व गोंदिया शहरातील प्रभाग निहाय्य बूथ कमिटीचा आढावा घेण्यात आला.
दरवषी प्रमाणे शिक्षण महर्षी स्व.मनोहरभाई पटेल जयंती समारोह आयोजित करण्यात आला आहे. या समारोहात देशाचे माननीय उप राष्ट्रपती सह राज्याचे उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील अनेक मंत्री गोंदिया भंडारा जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रसंगी येणार आहेत. या कार्यक्रमाची तयारी जय्यत तयारी सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे त्याचप्रमाणे हा कार्यक्रम जरी पक्षाचा नसला तरी आमचे नेते प्रफुल पटेलजी यांचा कौटुंबिक कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी आपले सहकार्य महत्वाचे राहणार आहे त्यानुषंगाने प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी अशी विनंती माजी आमदार राजेंद्र जैन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस च्या बैठकीत केली.
यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, विनोद हरीणखेडे, प्रेमकुमार रहांगडाले, नानू मुदलीयार, अशोक सहारे, विनीत सहारे, सुनील भालेराव, प्रेम जयस्वाल, सचिन शेंडे, विजय रगडे, माधुरी नासरे, आशा पाटील, भगत ठकरानी, खालीद पठाण, राजू एन जैन, राजेश दवे, आनंद ठाकूर, गोपीचंद थावाणी, टी एम पटले, मयूर जडेजा, हरिराम आसवाणी, लक्ष्मीकांत दहाटे, प्रदीप ठवरे, हरबक्स गुरनानी, हरिराम आसवाणी, लक्ष्मीकांत दहाटे, प्रदीप ठवरे, हरबक्स गुरनानी, संदीप पटले, पुस्तकला माने, शर्मिला पाल, सरोज कोहळे, रुचिता चव्हाण, तृप्ती चौरागडे, सुदर्शना वर्मा, निर्मला बिसेन, सुशीलाताई पोरच्चट्टीवार, माया अग्रवाल, संजीव राय, तुषार ऊके, राज शुक्ला, गणेश डोये, संजीव बापट, राकेश वर्मा, विनायक खैरे, विष्णू शर्मा, विजेंद्र जैन, हरगोविंद चौरसिया, महेश करियार, लखन बहेलिया, रमण ऊके, हर्षवर्धन मेश्राम, वीरेंद्र इरपाते, लव माटे, विनोद कोहडे, राजू भगत, दीपक कनोजे, कपिल बावनथडे, विनायक शर्मा, नागो बन्सोड, सुनील पटले, शैलेश वासनिक, अमित अवस्ती, एकनाथ वहिले, गुणवंत मेश्राम, रमेश कुरील, छोटू रामटेककर, रौनक ठाकूर, अविनाश महावत, कुणाल बावनथडे, सदाशिव वाघाडे, केसरीचंद बिसेन, मुनेश्वर कावडे, नितीन टेंभरे, योगेश कंसरे, विशेष छूगानी, मनीष कापसे, आर डी अग्रवाल सहित मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.