ढिवरटोला (तिरखेडी) येथे ओपन कबड्डी स्पर्धा संपन्न

0
22
1

सालेकसा / बाजीराव तरोने

वीर  बिरसा मुंडा कबड्डी क्लब ढिवरटोला (तिरखेड़ी) च्या वतीने दि.03/02/2024 ते दि.04/02/2024 पर्यंत ओपन कब्बड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. याप्रसंगी बक्षिस वितरण समारोह मध्ये कार्यक्रमात विशेष अतिथि दंतचिकिस्क डॉ. श्रीकांत  राणा यानी विद्यार्थी हा कसा घड़ावा, तरुण वर्गा मध्ये खेळा विषयी ऊर्जा कशी निर्माण करावी यावर सविस्तर मार्गदर्शन केले व आजचा तरुण  हा व्यसनाधीन झालेला आहे.म्हणून व्यसनापासून दूर कसे राहता येईल याचा सोपा मार्ग काय हे ही स्पष्ट करुन सांगितले.
कबड़ी हा खेळ आज गल्ली पासून दिल्ली पर्यंत सुरु आहे, खेड़ाडू ने खेड़ाडू चा सम्मान करणे फार आवश्यक आहे. या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख अतिथि  सौ. अर्चना ताई मडावी, विमल ताई कटरे, बबलू कटरे, रवि कटरे, प्रिया शरणागत व गावातील सर्व मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्र संचालन कार्तिक पटले यानी केले तर आभार प्रदर्शन विजय उइके यांनी केले.