आपला विदर्भवर्धा

गौरव : देवळीची गायीका समिक्षा हटवार यांना राष्ट्रीय सिने कला गौरव 2024 पुरस्काराने सन्मानित

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गजानन पोटदुखे

दि. 4 फेब्रुवारी रोजी शिवशाही सभागृह संभाजी नगर येथे समिक्षा हटवार यांचा राष्ट्रीय (उत्कृष्ठ गायिका) म्हणून 2024 सिने कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. काशीनाथ, लोकरंग, रूपा ,एन फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने “राष्ट्रीय सिने कला गौरव पुरस्कार” सोहळा 2024 संपन्न झाला. चित्रपट क्षेत्रातील अनेक नामवंत कलावंताना त्यांच्या उत्कृष्ठ कामगिरीची दखल घेत त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
देवळी, जिल्हा वर्धा येथील समीक्षा संजय हटवार यांनी अत्यंत कमी वयात कला शाखेत शिक्षण घेत उत्कृष्ठ गायीका म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना गित गायनाच्या माध्यमातून अनेक विदर्भ व जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाले. तसेच मराठी चित्रपट ” कुंकु पुसलं कर्जान ” यामध्ये आपल्या मधूर आवाजात शिर्षक गीतांचे गायन केले.आणि नवीन मराठी चित्रपटातील गित ऐकन्याची उत्सुकता कला प्रेमीमध्ये दिसून येते आहे.सिने कला गौरव पुरस्कार पुरस्कृत समिक्षा हिचे सर्वत्र कौतुक होत आहे.तिने यशाचे श्रेय गुरूंना आणि आई वडिलांना दिले.

error: Content is protected !!