वर्धा जिल्हा प्रतिनिधी:- गजानन पोटदुखे
दिनांक :- 06 फेब्रुवारी 2024
आज दिंनाक 4/2/2024 रोजी वार्षिक विदर्भ पटवारी संघ वर्धा जिल्हा वर्धा उपविभाग वर्धा शाखेची नविन कार्यकारणी निवडणूक घेण्यात आली.या आमसभेला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मडंळ अधिकारी संघटनेचे अध्यक्ष श्री. राजू झामरे मंडळ अधिकारी वर्धा, मंडळ अधिकारी संघटनेचे सचिव श्री. प्रवीण हाडे मंडळ अधिकारी वर्धा, माजी अध्यक्ष विदर्भ पटवारी संघ वर्धा, श्री शैलेश देशमुख प्रदीप इंगळे सचिव विदर्भ पटवारी संघ शाखा वर्धा,श्री यशवंत लडके सहसचिव विदर्भ पटवारी संघ वर्धा श्री रमेश भोले मतदान अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीत नविन कार्यकारणी निवडण्यात आलेली आहे अध्यक्ष या पदावर राजेशकुमार खामनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपाध्यक्ष या पदासाठी श्रीमती सिमा बोटरे.यांची निवड करण्यात आली आहे सचिव या पदासाठी सारंग भाइक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सहसचिव या पदासाठी आशीष सहारे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नवनियुक्त कार्यकारणीचे जिल्हा शाखेच्या वतीने खुप खुप अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत.