जिल्हा प्रतिनिधी/सतीश पटले
तुमसर तालुक्यातील चुल्हाड येथे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर अंतर्गत येणाऱ्या परमात्मा एक सेवकांनी मानधर्माचे भव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रवीण ऊराडे कोषाध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर यांच्या हस्ते सेवक संमेलनाचे अध्यक्ष राजू मदनकर अध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आले. दरम्यान सेवक संमेलन निमित्त गावात स्वच्छता अभियान, सामूहिक हवन कार्य, भागवत कार्याची चर्चा बैठक, कलापथक, रक्तदान शिबिर व गावातील मुख्य मार्गाने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. या शोभायात्रेत परिसरातील परमात्मा एक सेवकांनी डीजेच्या तालात ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत शोभायात्रा काढली या शोभायात्रेत काढलेली झांकी सर्वांचे मनमोहक ठरली. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून परमात्मा एक सेवक आमदार नरेंद्र भोंडेकर ,पंचायत समिती सभापती नंदु रहांगडाले, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती रमेश पारधी, जिल्हा परिषद सदस्य बंडू बनकर , पंचायत समिती सदस्य कांचनलाल कटरे, सरपंच चंदा कंठीलाल ठाकरे, उपसरपंच डॉक्टर रमेश पारधी , पोलीस पाटील चतुर्भुज रहांगडाले सुकळी, पोलीस पाटील विजय अंबुले, कार्यक्रमाचे आयोजक व ज्येष्ठ मार्गदर्शक आसाराम तोरणकर, मार्गदर्शक कृष्णराव टांगले, परमात्मा एक सेवक मंडळातील सर्व पदाधिकारी तसेच परिसरातील हजारोंच्या संख्येत परमात्मा एक सेवकांची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे संचालन शशिकांत तोरणकर, अनिल घरजारे, अतुल कटरे यांनी केले.

