दारू विक्रेत्यांचे पत्रकारांवर हल्ला प्रकरण.
वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गजानन पोटदुखे
दिनांक :- 06 फेब्रुवारी 2024
देवळी येथील न्यूज प्रभात चॅनल चे जिल्हा प्रतिनिधी गजानन पोटदुखे यांच्यावर बातमी का केली यांच्या राग धुरून अथर्व भोजनालयाचे मालक दारू विक्रेते जगन रामकृष्ण वैद्य व त्यांची पत्नी निर्मला जगन वैद्य यांनी शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिली होती. या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात यावा यासंदर्भात निवासी नायब तहसीलदार प्राजक्ता बारसे यांना पत्रकार संरक्षण समिती व व्हॉइस ऑफ मीडिया च्या पत्रकाराच्यावतीने निवेदन देण्यात आले. व कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.तसेच देवळी पोलीस स्टेशनला सुद्धा निवेदन देण्यात आले आहे. तरी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी होत आहे.जेणेकरून पत्रकारांना जीवाने मारण्याची धमकी देणाऱ्या दारू विक्रेत्यांवर अंकुश लागेल. व लोकशाहीचा चौथा स्तंभ समजणाऱ्या पत्रकारांना स्वातंत्र्यरित्या काम करता येईल.यासाठी आरोपीवर त्वरित पत्रकार सुरक्षा अंतर्गत कायद्याने कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन दिले. यावेळी देवळी तालुक्यातील पत्रकार शेख सत्तार,योगेश कांबळे,राजू वटाने,गजानन पोटदुखे,नरेश ढोकणे,किरण ठाकरे,समीर शेख,गणेश शेंडे,सागर झोरे, विनोद घोडे,आदी पत्रकार उपस्थित होते.

