इस्रोची महाअंतरीक्ष यात्रा श्री स्वामी विवेकानंद पब्लिक विद्यालयात…

0
41

जिल्हा परिषद आदर्श वरिष्ठ प्राथ. शाळा शिवणीच्या 57 विद्यार्थ्यानी दिली भेट : अवकाश संशोधनाबद्दल घेतली माहीती

गोंदिया / धनराज भगत

आमगांव येथील श्री स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल च्या भव्य पटांगनात प्राचार्या स्मृति  छपरिया यांच्या  उपस्थितीत  स्पेस ऑन व्हील्स अंतर्गत इस्रोची फिरती महाअंतरीक्ष यात्रा सुरु झाली. या स्पेस ऑन व्हील्स वाहनाला जि.प.आदर्श वरिष्ठ प्राथ. शाळा शिवणीच्या वर्ग 6 व 7 च्या 57 विद्यार्थ्यानी भेट दिली.
यावेळी तज्ञ सुजित चव्हाण यांनी स्पेस ऑन व्हील्स संदर्भात उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. इस्रोच्या महाअंतरीक्ष यात्रेन्तर्गत विद्यार्थ्यांना
इस्रोच्या आतापर्यंत झालेल्या मोहिमा, नवीन संकल्पना, उपग्रहासंदर्भात व अवकाश संशोधनासंदर्भात माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनातील उपस्थित प्रश्न सुधीर उपाध्याय,ओमेश्वर टेंभरे आणि मुकेश कांबळे श्री स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूलच्या शिक्षकांकडून करून घेतले.
प्रतिक्रिया : कु.माही राहंगडाले (विद्यार्थिनी) ☝️☝️
जि. प. आदर्श वरिष्ठ प्राथ. शाळा शिवणी ची विद्यार्थिनी कु.श्रुति राहंगडाले हिने इस्रो संस्थेतर्फे घेतलेल्या रंगोली व चित्रकला स्पर्धेत भाग घेऊन तृतीय क्रमांक प्राप्त केला.या पूर्वी विज्ञान प्रदर्शनीत तालुक्यातून तृतीय क्रमांक प्राप्त करून जिल्हा विज्ञान प्रदर्शनीत भाग घेतला आहे.
यावेळी गुलाब भुसारी मुख्याध्यापक,एल सी चौधरी, एस व्ही लक्षणे, के. जी. रहांगडाले, एस. आर. असाटी या शिक्षकानी सहभाग घेतला.
Previous articleपत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करा, देवळी तहसीलदार आणि पोलीस स्टेशन, देवळी येथे निवेदन…… 
Next articleकार्यक्रम परिवर्तन सुचना