शिक्षकांचा नक्षलभत्ता मंजूर : थकबाकी मिळणार

0
65

गोंदिया / धनराज भगत

6 ऑगस्ट 2002 च्या शासन निर्णयानुसार उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांच्या आदेशाचा संदर्भ घेऊन सर्व शिक्षकांना 1500 रुपये नक्षलभत्ता व अतिरिक्त घरभाडे भत्ता थकबाकीसह देण्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया यांनी आदेश काढला आणि त्या आदेशानुसार सर्व शिक्षकांना 1500 रुपये नक्षलभत्ता व घरभाडे भत्ता लागू केलेले आहे. संबंधित आदेशानुसार ‍जिल्ह्यातील सर्व शिक्षक कर्मचारी यांना थकबाकी मिळावी म्हणून शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना निधीची मागणी केली होती. त्यानुसार थकबाकी बाबतचा निधी जिल्हा परिषद गोंदियाला प्राप्त झाला आहे आणि ही थकबाकी जिल्ह्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. या संदर्भात थकबाकी शालार्थ प्रणालीने शिक्षक कर्मचारी यांना मिळावी म्हणून शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याशी पत्रव्यवहार करुन शालार्थ प्रणाली Tab उपलब्ध करुन देण्यासाठी विनंती केली आहे.

         जिल्हा प्रशासनाच्या नावावर कुणीही सदर थकबाकी मिळवून देण्यासाठी जर पैशाची/आर्थिक मागणी करीत असतील तर कुणीही अशा लोकांना बळी पडू नये. असे आवाहन डॉ. महेंद्र गजभिये, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गोंदिया यांनी केले आहे.      

Previous articleशिक्षक भरतीची अखेर जाहिरात प्रसिद्ध
Next articleदिनांक ०७/०२/२०२४ व ०८/०२/२०२४ पाणी पुरवठा बंद राहणार आहे