गोंदिया / धनराज भगत
गोंदियाची डॉ. सृष्टी बाहेकर (अभिनेत्री) दिसणार एका नव्या भूमिकेत झी टीव्ही च्या ‘ शिवा ‘ मालिकेत ” दिव्या ‘ या भूमिकेत दिसणार. ही मालिका १२ फेब्रुवारी पासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता येणार आहे.
डेंटिस्ट / दंतवैद्य असलेली सृष्टीने इंडस्ट्री मध्ये प्रत्येक कलाकार जशी थिएटर पासून आपली सुरुवात करतो तशीच तिने देखील केली. नंतर ” इंडिया के मस्त कलंदर ” या कार्यक्रमात आपलं पदार्पण केलं. आपल्या कौशल्याच्या जोरावर, रोबो विक्रम सिंह या ॲक्ट पार्टनर सोबत तिने अंतिम फेरी पर्यंत मजल गाठली. त्यानंतर तिने “जय जय स्वामी समर्थ ” या मालिकेत देव्यानीची भूमिका पटकावली. तिच्या या प्रवासात सोनी टीव्ही च्या “तुमची मुलगी काय करते” आणि” कारण गुन्ह्याला माफी नाही ” या मालिकेने अजून बहार आणली. त्यात ती बॉशंधरा हे पात्र साकारात असतांनाच आता झी मराठी या वाहिनी वर पदार्पण करणारी ” शिवा ” या मालिकेत ती ” दिव्या ” च्या भूमिकेत दिसणार आहे. सृष्टी वैद्यकिय क्षेत्रातील (तिर्हाईत) असून देखील; ध्यास , मेहनत , चिकाटी आणि कौशल्याच्या जीवावर सृष्टीने मराठी इंडस्ट्री मध्ये आपलं स्वतचं अस्तित्व निर्माण केले. तिच्या पुढच्या प्रवासा साठी मनःपूर्वक शुभेच्छा.

