आपला विदर्भगोंदियाताज्या घडामोडी

ग्रामपंचायत पोटनिवडणूक मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

 गोंदिया / धनराज भगत

जिल्ह्यातील माहे जानेवारी 2024 ते जून 2024 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नवनिर्मीत व मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे निवडणुका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील सदस्य/थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या पोटनिवडणुकांसाठी पारंपारीक पध्दतीने राबविण्यात यावयाचा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला असून त्यानुसार प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी 2024. हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी बुधवार 14 फेब्रुवारी 2024 ते मंगळवार 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत. प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्याचा शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी 2024 आहे. असे उपजिल्हाधिकारी (सामान्य) चंद्रभान खंडाईत यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

error: Content is protected !!