यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ द्वारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 राबविण्यात आले

0
84

न्यूजप्रभात वृत्तसेवा

आमगाव – गोंदिया जिल्हामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक द्वारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अमंलबजावणी करिता विभागीय केंद्रातील वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. नारायण मेहरे आणि वरिष्ठ सहायक श्री. संभाजी मोरे विभागीय केंद्र नागपूर यांच्या मार्गदर्शनात गोंदिया जिल्हातील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणारे इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या बाबत माहिती होण्या करिता ‘शाळा संपर्क अभियान’ राबविण्यात आले. प्रत्येक तालुका मधील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष जाऊन विधार्थ्यांशी सवांद साधण्यात आले. नविन शैाणिक धोरणात काय नवीन शैक्षणिक विषयात काय बदल करण्यात आले या विषयी सविस्तर माहिती डा. नरेंद्र जगनिक यांनी आमगाव , सालेकसा आणि देवरी तालुक्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जावून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० बाबत माहीती दिली.

Previous articleग्रामपंचायत पोटनिवडणूक मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर
Next articleशरद पवारांच्या पक्षाला मिळालं नव नाव…”नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – “शरदचंद्र पवार”हे नव नाव