संघटणे ची धार कायम ठेवण्यासाठी संघटनेचा जिवंतपणा जोपासने गरजेचे….बी.डब्लु. कटरे

0
3
1

गोंदिया / धनराज भगत

शिक्षण विभागा कडे कर्मचार्यांचे बरेचसे प्रश्न पचायंत समीती स्तरापासून राज्य स्तरावरपर्यंत प्रलंबित असतात.
प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सम्बंधित विभाग प्रमुखांकडे,संघटणेच्या पदाधिकार्यांनी सभा,चर्चा,निवेदन,धरने इ.मार्फत सतत पाठपुरावा केल्यानंतच प्रलंबित प्रश्न सुटतात.अर्थात संघटणेची धार कायम ठेवण्यासाठी संघटनेचा जिवंतपणा जोपासणे गरजेचे असते
यासाठी संघटणेचे पदाधिकारी अभ्यासू,संयमी,चारित्र्यवान व समर्पक भावनेने कार्य करणारे असणे गरजेचे आहे.
परंतु दुर्दैवाने हे चित्र सध्या जिल्हास्तरावर कार्य करणार्या संघटणेत दिसत नाही, जिल्ह्यातील सदस्यांनी अस्या पदाधिकार्यांना अतिशीघ्र समज देणे गरजेचे आहे.
अन्यथा अस्या संघटनेचा अस्त होण्यास काहीच वेळ लागणार नाहीत.असे प्रतिपादन गोंदिया जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे माजी कार्यवाह बी.डब्लु.कटरे यांनी केले.
स/अर्जुनी तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतिने आयोजित सत्कार कार्यक्रमात ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते.
सडक अर्जुनी तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत कार्यरत परंतू नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या बारा मुख्याध्यापकांचा सेवानिवृत्तीपर सत्कार बुधवार ता.7 फेब्रुवारी रोजी शुभदिप विद्यालय बोपाबोडी (सौदंड) येथे आयोजित करण्यात आलेला होता.
अध्यक्षस्थानी संघाचे तालुकाध्यक्ष प्राचार्य आर.एन.हेडाऊ होते.
प्रस्ताविक.शुभदिप विद्यालय बोपाबोडीचे संस्थापक तथा मुख्याध्यापक सुरेश गहाणे यांनी प्रस्तुत केले.
विचार मंचकावर सत्कार मुर्ती से.नि.प्राचार्य डी.आर.पुस्तोडे लोकसेवा उच्च माध्यमिक विद्यालय कोसमतोंडी, से.नि.प्राचार्य ए.टी.वालदे छ.वि.पांढरी,से.नि.प्राचार्य एच.एस.बावनकर वसंत हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय डोंगरगाव, से.नि.प्राचार्य ए.पी.मेश्राम जि.प.उच्च माध्यमिक विद्यालय स/अर्जुनी,से.नि.मुख्याध्यापक एम.बी.कापगते,श्री.शाम सुंदर बोरकर हायस्कूल खोडशिवनी,से.नि.प्राचार्य खुशाल कटरे,आदिवासी विकास हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय खजरी(डोंगरगाव),से.नि.प्राचार्य हरिभाऊ किरणापूरे शासकीय आश्रम शाळा शेंडा,से.नि.प्राचार्य एम.जी.परशुरामकर छ.वि.पांढरी,से.नि.प्राचार्य मधुसूदन अग्रवाल लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सौंदड चे प्रतनिधी श्री टेंभुर्णीकर उपस्थित होते.
सडक अर्जुनी तालुका मुख्याध्यापक संघांच्या वतिने सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापकांनी शैक्षणिक समस्या कस्या सोडवाव्यात याचे मार्गदर्शन केले.
सत्कार कार्यक्रमाचे संचालन सडक अर्जुनी तालुका मुख्याध्यापक संघाचे कार्यवाह तथा मुख्याध्यापक दिलीप चाटोरे त्रिवेणी हायस्कूल सडक अर्जुनी यांनी केले
रत्नदिप दहिवले हायस्कूल चिखली चे मुख्याध्यापक लिलाधर पातोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.