डॉ.राणा (समाजसेवी)यांनी गोर्रे गावाला दिली भेट

0
6
1

गोंदिया / धनराज भगत

दि.०५/०२/२०२४ ला समाजसेवी डॉ. श्रीकांत राणा यांनी मौजा गोर्रे येथील नागरिकांसी  भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गावातील सर्व जन समुदाय एकत्रित होऊन वेगवेगळ्या विषयांवर  चर्चा झाली. डॉ राणा यानी सांगीतले की गावात पुष्कळ रोजगार समस्या आहेत, आणि  या कारणामुळे जे विकास हव ते विकास होत नाही. तरी पण आपण जे गावात एकता बनवून ठेवलेली आहे त्याने गावातील समस्या वर निराकरण करण्यास मदत होते.  आपण गावातील शाळा गावची शाळा आमची शाळा या अंतर्गत इमारत चे जीर्णोद्धार चे कार्य पूर्ण केले ते ही जन समुदाय च्या सहयोगाने हहे उल्लेखनीय कार्य आहे. डॉ. राणा यानी सुद्धा आश्वाशन दिले की ,अजुन काही बऱ्याच समस्या आहेत ,मी एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने आपल्या समस्या निराकारणास मदत करेन व खरोखर आपल्या गावात जी एकता आहे त्याने आपण कोणतेही कार्य पूर्ण करता येतो ,एकता ही भारताची सर्वात मोठी ताकद आहे.एकत्र येऊनच आपण देशाला एक अधिक मजबूत प्रजासत्ताक बनवू शकतो. आणि म्हणून एकत्रित राहणे अतिशय गरजेचे आहे अशा प्रकारे अनेक गोष्टी वर चर्चा केली. याप्रसंगी गावकरी मान्यवर मंडळी उपस्थित होते.