आपला विदर्भभंडारा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिहोरा येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

भंडारा /प्रतिनिधी 

दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिहोरा येथील भव्य पटांगणावर वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.या स्नेहसंमेलनात इयत्ता पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेऊन उपस्थित पाहुणे आणि पालक यांच्यासमोर आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक सुषमाताई छगन पारधी जिल्हा परिषद सदस्या,आणि अध्यक्ष म्हणून रंजनाताई दिनेश तुरकर सरपंच सिहोरा,विशेष अतिथी राहांगडाले सर प्राचार्य जि प हायस्कूल सिहोरा,मोहतुरे सर प्राचार्य महाराष्ट्र विद्यालय सिहोरा, परिहार सर प्राचार्य आदर्श विद्यालय सिहोरा,निलेश गोसावी पोलीस ठाणेदार सिहोरा, दीपमालाताई भवसागर पंचायत समिती सदस्या , धनेंद्र तुरकर माजी अर्थ व शिक्षण सभापती जि प भंडारा , बी एस तुरकर सर, चौधरी मॅडम, रुपालीताई मलेवार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा ,खेताडे सर केंद्रप्रमुख तथा शिक्षण विस्तार अधिकारी पं स तुमसर ,शरद खेताडे, शामल तुरकर, नरेंद्र रहांगडाले, विजय केरेकार,रवींद्र तुरकर,ओमकार चव्हाण मेघराज हेडाऊ ,चित्रारेखाताई सोनकुसरे, शुभांगीताई लारोकर, मंदाताई तुमसरे, अफसाना पठाण,भारतीताई पराते , दिनेश तुरकर, मधुकरअडमाचे, प्रतिक घोडीचोर,महेश कामथे मंदाताई गोटेफोडे,वैशालीताई राऊत,धनिकाताई निनावे सविताताई नेवारे,लताताई दलाल देवशीलाताई तुरकर रीताताई वासनिक सोबतच सर्व पालक आणि विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले.पाहुण्यांच्या स्वागता नंतर प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात झाली.याप्रसंगी इयत्ता पहिली ते पाचवी मधील विद्यार्थ्यांनी बालगीते सादर केली.तर काही विद्यार्थ्यांनी गाण्यावर सुंदर असे नृत्य केले. तर इयत्ता पाचवी मधील विद्यार्थिनींनी हळदी कुंकू या नाटिकेचे सादरीकरण केले अशाप्रकारे सर्व विद्यार्थ्यांनी आपला कला गुण प्रदर्शित करून शाळेचे नाव उंचावले.यावेळी मुलाच्या वाढदिवसानिमित्त चित्ररेखाताई टेकचंद सोनकुसरे यांनी शाळेला सुंदर असे डायस भेटवस्तू म्हणून दिली.दुसऱ्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस वितरक म्हणून लाभलेले प्रमुख अतिथी कटनकार सर सेवानिवृत्त केंद्रप्रमुख, रंजनाताई तुरकर सरपंच सिहोरा,रुपालीताई मलेवार अध्यक्ष, आणि सर्व शाळा समितीच्या पदाधिकारीच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

यावेळी पदोन्नतीने दुसऱ्या शालेत गेलेल्या शिक्षिका शर्मा मॅडम उच्च श्रेणी मुख्याध्यापिका आणि तुरकर मॅडम उच्च श्रेणी मुख्याध्यापिका यांचा सत्कार करण्यात आला.बक्षीस वितरणानंतर शालेय विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील सहाय्यक शिक्षिका गभने मॅडम, यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय बोपचे मॅडम, निनावे सर रायकवार मॅडम,तुरकर सर,सोनकुसरे ताई, सोनीताई रंभाड, प्रमिलाताई तुरकर यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!