भंडारा /प्रतिनिधी
तुमसर बाजार समितीच्या मागील वर्षी निवडणुका लागल्या होत्या, पण मोहाडी तालुक्यातील 58 ग्रामपंचायत च्या निवडणुका झालेल्या नव्हत्या, त्यामुळे 58 ग्रामपंचायत चे सदस्य, सरपंच, उपसरपंच यांचा मतदाणाच्या अधिकारापासून वंचित रहावे लागले असते.. यासंबंधी तालुका मोहाडी मधील ग्राम हरदोली येथील माजी सरपंच तथा राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे यांही मुंबई उच्चं न्यायालंय खंडपीठ नागपूर द्वारा रिट याचिका दाखल केली होती*. त्या बाजार समितीच्या निवडणुकीला स्टे देण्यात आले होते. सदाशिव ढेंगे यांही केलेली मागणी रास्त असल्याने कोर्टाने रिट याचिका स्वीकारली, त्यात सदाशिव ढेंगे यांही असे म्हटले होते कि,मोहाडी तालुक्यातील 58 ग्रामपंचायत च्या निवडणुका घेण्यात याव्या व निवडून आलेल्या सदस्यांचे बाजार समितीच्या मतदार यादीत नावे समाविष्ठ करण्यात यावे. त्यानंतर लगेंच कोर्टाने 58 ग्रामपंचायत च्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले व निवडणुका झाल्यात. *बाजार समीतिच्या निवडणुका होणे आवयश्यक असून त्यात सर्व निवडून आलेले सदस्य यांचा मतदार यादीत नावे समाविष्ठ करून बाजार समिती निवडणुका घेण्यात याव्या या संबंधी कोर्टाला कळविण्यात आले. त्या अनुषंगाने आज दिनांक 8 फेब्रुवारी 2024 ला नागपूर न्यायालय खडपीठ यांही आज जजमेंट दिला कि 6 हप्त्यात बाजार समितीच्या मतदार यादीत 58 ग्रामपंचायत सदस्य यान्हा समाविष्ठ करून,3 महिन्यात तुमसर बाजार समितीच्या निवडणुका घेण्यात याव्या *.यामुळे आता मोहाडी तालुक्यातील 58 ग्रामपंचायत चे निवडणुन आलेले सदस्य मतदाणाचा हक्क बजावणार आहेत. *यामुळे मतदार यादीत समाविष्ठ झालेले 58 ग्रामपंचायत च्या सरपंच, उपसरपंच, सदस्य यांही सदाशिव ढेंगे यांचे अभिनंदन केले आहे.