जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान आयोजित महारक्तदान शिबीर

0
96

 

गोंदिया / धनराज भगत

अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज संस्थांन नानिजधाम च्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत भव्य रक्तदान शिबीरांचे आयोजन गोंदिया  जिल्ह्यात करण्यात आले आहे.यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात दि.१० ते २५ फेब्रुवारी दरम्यान एकुण ८४० रक्तदान शिबीरांचे आयोजन करून संपुर्ण महाराष्ट्रातुन १ लाख रक्त बाटल्या महाराष्ट्र शासनाला देण्याचा संस्थांनाचा मानस आहे.
गोंदिया जिल्हात एकुन १५ शिबीरांचे आयोजन करण्यात आले असुन प्रत्येक शिबीरामध्ये १०० रक्त बाटल्या संकलन करण्याचे उदिष्ट आहे.त्या अनुषंगाने दि.१० फेब्रुवारीला २०२४ ला तिरोडा, ११ फेब्रुवारी ला किशोरी .१५फेब्रुवारी तेढा. १६फेब्रुवारी आमगाव .१८ फेब्रुवारी अर्जुनी मोरगाव, गोरेगाव, गोंदिया, सडक अर्जुनी, सालेकसा. २० फेब्रुवारी देवरी व आमगाव. २१ फेब्रुवारी देवरी .२५फेब्रुवारी डव्वा ,एकोडी ,साखरीटोला या ठिकाणी शिबीर संपन्न होणार आहेत.
तरी या रक्तदान शिबीरामध्ये जास्तीत-जास्त लोकांनी सहभाग घेऊन रक्तदान करण्याचे आव्हान जिल्हा निरिक्षक नवरंग मेश्राम,जिल्हा अध्यक्ष मूलचंद खंडवाये,युवा अध्यक्ष निखिल शहारे,जिल्हा बिन प्रमुख राहुल बागडे ,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख योगराज डोंगरवार, सामाजिक उपक्रम प्रमुख दीनदयाल तुळशीकर संपुर्ण जिल्हा कमेटी, तालुका कमेटी,सेवाकेंद्र कमेटी,आरतीकेंद्र कमेटी,गुरूबंधु गुरूभगीनी यांनी केले आहे.

Previous articleखा.प्रफुल पटेलांच्या पुढाकाराने जिल्हावासीयांची झाली स्वप्नपुर्ती
Next articleबेलाटी दुमदुमली हरीनामाच्या गजरात