बेलाटी दुमदुमली हरीनामाच्या गजरात

0
51

विदर्भातील मिनी पंढरपूर समजल्या जाणाऱ्या बेलाटी बुजुर्ग येथील हरिनाम सप्ताहाची समाप्ती

तिरोडा / पोमेश राहंगडाले

तालुक्यातील मिनी पंढरपूर समजल्या जाणाऱ्या बेलाटी बुजुर्ग येथे दिनांक ३१ जानेवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह अर्थात श्री संत निवृत्तीनाथ महाराज पुण्यस्मृतिदिन उत्सव संपन्न झाला, यामध्ये लांखो हरिभक्त श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले व महाप्रसाद ग्रहण करून पावन झाले,बेलाटी बुजुर्ग येथील परंपरा मागील ९५ वर्षापासून अखंड पणे अविरत सुरू आहे हे विशेष.

हा हरिनाम सप्ताह दरवर्षी प्रमाणे यंदाही”पोष कृष्ण पक्षपंचमी” या तिथीला सुरुवात होऊन पोष कृष्ण बारस या दिवशी समाप्ती करण्यात आली ,यामध्ये सातही दिवस विविध कार्यक्रम व हरिनाम सप्ताह घेण्यात आला, या दरम्यान गावात व परिसरातील गावात सुध्दा नवचैतन्याचे व भावभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.

बेलाटी येथे श्री विठ्ठलरुक्ममाईचे भव्य मंदिर आहे येथे वर्षभर विठ्ठल भक्त दर्शनासाठी येत असतात,

या सप्ताहाची सुरूवात कृष्ण पंचमी दिनांक ३१ जानेवारी २०२४ ला सकाळी ११ वाजता बेलाटी देवस्थानचे अध्यक्ष श्री सुरेश रामकरण धुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली श्री मनोज असाटी यांच्या हस्ते विना नंदादीप ज्योती प्रज्वलित करून झाली व दररोज सप्ताहाभर हभप नरेशानंद महाराज, हभप मुकुंजी थोटे महाराज, हभप.आळंदीकर महाराज मुक्काम अमरावती, हभप.घोरमारे महाराज निमगाव इंदोरा, हभप.रामप्रसादजी पटले महाराज आळंदीकर मुक्काम बोरगाव, हभप. बळीरामजी ओके महाराज छोटा गोंदिया, हभप. श्रीधर जी राऊत महाराज प्रेम नगर नागपूर, हभप. कृष्णरावजी वागळीकर महाराज चाळीसगाव वाघळी,तसेच हभप.पांडुरंग जी मुरूमकर महाराज पांढुर्णा बनगाव यांचे हरि किर्तन झाले आणि सप्ताहाच्या उत्तरार्धात समारोपीय किर्तन हभप बंडुपंत खेडेकर महाराज नागपूर यांनी गोपालकाल्याचे किर्तन केले व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटातील युवा नेते श्री.रविकांत(गुड्डू)बोपचे यांनी सपत्नीक दहीहंडी यांच्या हस्ते फोडण्यात आली व हरीनाम सप्ताहाची सांगता झाली.

या अखंड हरिनाम सप्ताहात विविध हरिभक्त परायण महाराज यांच्या कीर्तनाने तसेच गावकरी मंडळींच्या सहभागाने मागील ९५ वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून पंचक्रोशीतील १०० पेक्षा जास्त गावातील हरिभक्त महाप्रसाद व कीर्तनाचा आनंद घेतात,
बेलाटी येथील सप्ताह हा लोकवर्गणीतून उभारला जातो, यामध्ये पैसे,धान्य, पोहा,दही किंवा इतरही साहित्य दानदाते दान करतात मंदिराचा आवार भव्य दिव्य असून यामध्ये भक्तनिवास बांधलेले आहे त्यामध्ये आलेल्या महाराज व भाविकांची राहण्याची, खाणपानाची व्यवस्था करण्यात येते, दहीहंडी च्या दिवशी बुंदीचे प्रसाद स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व.रामकरणजी धुर्वे यांच्या स्मृती प्रित्यर्थ मंदिर समितीचे अध्यक्ष सुरेशजी धुर्वे यांच्या कडून दरवर्षी असते,हरिपाठ समाप्तीच्या दिवशी सकाळी गावात पालखी प्रदक्षिणा व प्रभात फेरी काढण्यात येते त्यानंतर सर्वच उपस्थित लोकांचे भोजन करून उपवास सोडला जातो त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात येते गोपाळ काल्याचे किर्तन झाल्यानंतर लाह्यांचा प्रसाद गोपाळकाला दहीहंडी फोडून सर्वच भाविकांना वाटण्यात येतो. आलेल्या भाविकांना महाप्रसादाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येते. आधी हे जेवण पत्राळीमध्ये पंगत व्यवस्थेत देण्यात येत होते पण काळानुरूप बदल करून आत्ता बफे पद्धतीत हे महाप्रसाद सकाळी नऊ ते संध्याकाळपर्यंत सुरू असतो ,बेलाटीमधील प्रत्येकच घरी पाहुणे असल्यामुळे गावकरी महाप्रसादसाठी येऊ शकत नाही त्यामुळे हरिनाम सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी “पाकक्षाळ पूजा”करण्यात येते. यामध्ये गावकरी एकत्र येऊन मंदिराच्या आवारात महाप्रसादाचा आस्वाद घेतात हा संपूर्ण नित्यक्रम दरवर्षीच असतो.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अविरत कार्यकारणी मंडळ तसेच गावकरी यामध्ये सहभागी होऊन काम करतात, बेलाटी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री सुरेश रामकरनजी धुर्वे हे मागील पंधरा वर्षापासून निरंतर अध्यक्ष म्हणून अतिशय उत्कृष्ट पणे काम पाहतात तर सचिव श्री रेमेश्वर कुर्वे, कार्यकारिणी मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते रमेशजी वंजारी, कुवरलाल चौधरी,सेवकराम पारधी,घमेंद्र पटले,दीनदयाल चौधरी,कमल साठवणे, विठोबा कांबळे,भोजराज तुरकर,लक्ष्मण चौधरी,देवराव राऊत,कौशल बाई आगाशे, मोरेश्वर आगाशे,योगेश आगासे,मुनेश पटले, दयानंद आगाशे इत्यादी कार्यकारणीच्या लोकांनी व गावकऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

Previous articleजगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान आयोजित महारक्तदान शिबीर
Next article१४ को क्षत्रिय चक्रवर्ती सम्राट राजाभोज जयंती महारैली का आयोजन गोंदिया में…