उपराष्ट्रपती यांच्या दौऱ्यानिमित्त वाहतूक मार्गात परिवर्तन

0
67

गोंदिया / धनराज भगत

 स्व. मनोहरभाई पटेल यांचे जयंती व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजन निमित्ताने उपराष्ट्रपती (भारत सरकार) हे 11 फेब्रुवारी 2024 रोजी गोंदिया जिल्हयाचे दौऱ्यावर येणार आहेत. कार्यक्रम स्थळी वाहनांची मोठ्या प्रमाणात आवागमन होणार असल्याने खालील मार्गाने जड अवजड वाहनाचे आवागमण पर्यायी मागाने वळविण्यात आल्याची अधिसूचना जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांनी निर्गमित केली आहे. हा बदल तात्पुरत्या स्वरूपाचा असून नागरिकांनी या बदलाची नोंद घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

 उपराष्ट्रपती, महाराष्ट्राचे राज्यपाल व इतर मंत्री महोदय हे बिर्सी विमानतळ येथुन कारने एम. आय. ई. टी. कॉलेज, गोंदिया व डि. बि. सायन्स कॉलेज, गोंदिया येथे स्वर्ण पदक वितरण कार्यक्रम स्थळी येणार असुन रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात आवागमण राहणार असुन जड व अवजड वाहनां पासुन वाहतुकीची कोंडी होवुन गंभीर स्वरूपाचे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तसेच एखादा मोठा अपघात होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. तरी सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने लोकांच्या जीवीतास धोका निर्माण होवु नये, याकरीता दि. 11 फेब्रुवारी 2024 रोजी खालील मार्गाने जड अवजड वाहनाचे आवागमण पर्यायी मागाने वळविणे आवश्यक असल्याचे पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे  यांनी जिल्हा प्रशासनाला कळविले आहे.