राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 11 फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. सकाळी 8.15 वाजता वर्षा निवासस्थान मुंबई येथून मोटारीने मुंबई विमानतळाकडे प्रयाण. सकाळी 8.45 वाजता मुंबई विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने गोंदियाकडे प्रयाण. सकाळी 10 वाजता गोंदिया विमानतळ येथे आगमन व राखीव. सकाळी 10.55 वाजता उपराष्ट्रपती महोदयांचे आगमन प्रसंगी उपस्थिती. सकाळी 11 वाजता उपराष्ट्रपती महोदयांसमवेत मोटारीने डी.बी.सायन्स कॉलेज, गोंदियाकडे प्रयाण. सकाळी 11.30 ते दुपारी 1 पर्यंत डी.बी.सायन्स कॉलेज गोंदिया येथे उपराष्ट्रपती महोदयांसमवेत गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी व नामवंत व्यक्तींना सुवर्ण पदक पुरस्कार वितरण समारंभास उपस्थिती. दुपारी 1.05 ते 1.50 पर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कुडवा (गोंदिया) येथे उपराष्ट्रपती यांचेसमवेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदियाच्या भूमीपूजन सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 1.50 वाजता मोटारीने गोंदिया विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 2.15 वाजता गोंदिया विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने अकोलाकडे प्रयाण.