गोंदिया / धनराज भगत
राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे 11 फेब्रुवारी 2024 रोजी गोंदिया जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 11 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 7.30 वाजता खासगी विमानाने मुंबई येथून गोंदियासाठी प्रयाण. सकाळी 10 वाजता बिरसी विमानतळ येथे आगमन व हॉटेल ग्रॅन्ड सीता कडे प्रयाण व राखीव. सकाळी 11.30 ते दुपारी 1.00 पर्यंत डी.बी. सायन्स कॉलेज गोंदिया येथे आयोजित गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी सुवर्णपदक वितरण समारंभास उपस्थित राहतील. त्यानंतर कुडवा येथे होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या पायाभरणी समारंभाला उपस्थिती. दुपारी 2.30 ते 3.00 पर्यंत मनोहरभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व सैनिकी शाळेच्या परेडला उपस्थिती. तद्नंतर सोईनुसार मुंबईकडे प्रयाण.