आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण यशस्वी रित्या पार केल्या बद्दल सुमित चे सत्कार

0
102

 

गोंदिया / धनराज भगत

गोंडवाना विद्यापीठात गड़चिरोली च्या रासेयो विभागाच्या वतीने २५ डिसेंबर २०२३ ते ३ जानेवारी २०२४ या कालावधीत राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिर ‘आव्हान-२०२३’ आयोजित करण्यात आले होते. राज्यपाल रमेश बैस यांच्या कार्यालयाकडून या शिबिराचे आयोजन करण्यात येत असून यावर्षी गोंडवाना विद्यापीठात प्रथमच हे आपत्ती व्यवस्थापन शिबिर झाले यात २२ विद्यापीठांचा सहभाग राहिला होता. सोबतच धनवटे महाविद्यालचा सुमित ठाकरे या स्वयमसेवकाची निवड या शिविरा साठी करण्यात अलेली होती. दि. १० फेब्रूवारी २०२४ ला धनवटे महाविद्यालयात डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्नातकोत्तर रोप्य जयंती महोत्सव निमित्त शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांसह आमगांव येथील सुमित  चंपालाल  ठाकरे यांचे  सत्कार करण्यात आले. या कामगिरीबद्दल सुमितच्या स्नेही स्वजन व मित्र परिवारातर्फे कौतुक करण्यात आले.