विदर्भातील मिनी पंढरपूर समजल्या जाणाऱ्या बेलाटी बुजुर्ग येथील हरिनाम सप्ताह कार्यक्रम श्री रविकांत बोपचे यांची उपस्थितीत संपन्न

0
14
1

तिरोड/ पोमेश रहांगडाले

तिरोडा तालुक्यातील मिनी पंढरपूर समजल्या जाणाऱ्या बेलाटी बुजुर्ग येथे दिनांक 31 जानेवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह अर्थात श्री संत निवृत्तीनाथ महाराज पुण्यस्मृतिदिन उत्सव संपन्न झाला, यामध्ये लांखो हरिभक्त श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले व महाप्रसाद ग्रहण करून पावन झाले, बेलाटी बुजुर्ग येथील परंपरा ही मागील 95 वर्षापासून अखंडपणे अविरत सुरू आहे. हा हरिनाम सप्ताह दरवर्षी प्रमाणे यंदाही”पोष कृष्ण पक्षपंचमी*” या तिथीला सुरुवात होऊन पोष कृष्ण बारस या दिवशी समाप्ती करण्यात आली, यात युवा नेते श्री. रविकांत (गुड्डू) बोपचे यांच्या हस्ते सपत्नीक दहीहंडी फोडण्यात आली व हरीनाम सप्ताहाची सांगता झाली.