पवारी साहित्य कला संस्कृती मंडळच्या सत्र २०२४ – २०२९ करीता नवीन कार्यकारिणीचे “मंडळाच्या उपविधी/ बायलॉज” प्रमाणे आज दिनांक ११ फेब्रुवारी, २०२४ ला पवार विद्यार्थी भवन, कुकडे लेआउट, नागपूर येथे वार्षिक सामान्य सभेत निर्वाचन करण्यात आले. सदर सभेचे निवर्तमान अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टेंभरे यांच्या अध्यक्षतेखाली सामान्य सभा पार पडली. कार्यवाहीचे सुचारु संचालन एड. देवेंद्र चौधरी, निवर्तमान सचिव यांनी केले.
नवीन कार्यकारिणीची खालील प्रमाणे बिनविरोध निवड झाली –
अध्यक्ष – ज्येष्ठ साहित्यिक एड. लखनसिंह कटरे, बोरकन्हार, तह. आमगांव, जि. गोंदिया; उपाध्यक्ष – युवा साहित्यिक श्री छगनलाल रहांगडाले, खापरखेडा, जि. नागपूर; सचिव -प्रा. डॉ. राम चौधरी, जवाहर नगर, भंडारा, सहसचिव – ज्येष्ठ साहित्यिक छननसिंह पटले, नागपूर; कोषाध्यक्ष – ज्येष्ठ समाजसेवक श्री पृथ्वीराज रहांगडाले, नागपूर; सह-कोषाध्यक्ष – युवा साहित्यिक श्री इंजि. सुरेश देशमुख, नागपूर; सदस्यगण – १. ज्येष्ठ साहित्यिक श्री चिरंजीव बिसेन, गोंदिया; २. युवा साहित्यिक डॉ. तुफानसिंह पारधी, आगरवाडा (कटंगी) जि. बालाघाट; ३. ज्येष्ठ साहित्यिक श्री हरभजन बिरगडे, कारंजा, जि. वर्धा; ४. ज्येष्ठ साहित्यिक श्री रामचरण पटले, नागपूर आणि ५. सौ उषाबाई रमेश पटले यांची बिनविरोध निवड झाली. नवनिर्वाचित मंडळाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले . शेवटी निवर्तमान सचिव एड. देवेंद्र चौधरी यांनी आपला सचिव पदाचा कार्यभार नवनिर्वाचित सचिव डॉ राम चौधरी यांना सोपविला. आभार प्रदर्शनानंतर सभा संपली.