वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गजानन पोटदुखे
दिनांक :-12 फेब्रुवारी2024
देवळी – स्थानिक सृजन इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्यूनियर कॉलेज ऑफ सायन्स वतिने सृजनच्या पटागंणात स्व. प्रा. पंकज चोरे सर स्मृर्ती प्रित्यर्थ शिष्यवृत्ती योजनेचा शुभारंभ करण्यात आला. संस्था अध्यक्षा डॉ. श्रध्दा पंकज चोरे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात या शिष्यवृत्तीच्या लाभाबद्दल माहीती देतांना सांगितले की, ही शिष्यवृत्ती केवळ सूजन मधिल स्कुल व कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. यामध्ये 10 वी व 12 वी च्या बोर्ड परीक्षेत किमान 75% गुण संपादन करणे आवश्यक राहील. विद्यार्थ्यांची हजेरी 75% च्या वर असणे गरजेचे राहील. दहावीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातुन प्रथम येणान्या विद्यार्थ्यास सलग दोन वर्ष मिळेल. तसेच बारावीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातुन प्रथम येणा-या विद्यार्थ्यांस सलग तीन वर्ष मिळेल. या शिष्यवृत्तीबाबत सांगताना त्यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक शिक्षणासाठी अर्थसहाय्य केले जाईल. उपरोक्त शिष्यवृत्तीची विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन काण्यात आले.
या कार्यकमला संस्थेचे सचिव डॉ. प्रशांत चव्हाण, कोषाध्यक्ष श्री. निरज चोरे संचालिका श्रीमती निला चोरे, कु. प्रिती बरगट व कु. उत्कर्षा चोरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सौ. वदंना डहाके, सौ. वैशाली कापसे, श्रीमती उषा काळे, श्री. अमोल चोरे, श्री. विजय डहाके इत्यादी मान्यवरांसोबतच प्राचार्या सिमा वाघमारे, मुख्याध्यापिका कु. प्रिया वैद्य, तसेच विद्यार्थी, शिक्षिका, शिक्षक व कर्मचारी यांची उपस्थिती होती
कार्यकमाचे संचालन भारती कुबडे व पुजा पाठक यांनी केले तर किर्ती कामडी यांनी मान्यवरांचे आभार मानले.
कार्यकमाच्या यशस्वीसाठी पल्लवी काळे, मनिषा कात्रे, मनोज बकाणे, अनुप चिंचपाले, मयुर तेलरांधे, मयूर राऊत, अनघा अंबरकर, जोत्सना चोरे, निलेश शेंडे, ओझा मॅडम सावरकर मॅडम, वंदना चोरे, सुयोग राऊत, सुरज डाखारे, भोयर सर, तिवसे सर, शिवार्णी कडू, वैतागे मॅडम, कापसे मॅडम, मोटघरे सर, वंजारी मॅडम, गावंडे सर, दरणे मॅडम, भोय सर, मांडवकर मॅडम, यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर यांनी प्रयत्न केले.

