जिल्हा प्रतिनिधी/ सतीश पटले
तुमसर तालुक्यातील सोंड्या येथील बावनथडी नदीपात्रात उत्तम प्रतीची रेती उपलब्ध असून या रेतीला खूप मागणी आहे. यामुळे काही रेती तस्करांनी नदीपात्रातील रेतीचे अवैध उत्खनन करून रेती चोरीचा सपाटा लावला आहे. दरम्यान सोंड्या नदीपात्रातून रात्रीच्या सुमारास रेती चोरी होत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रश्मिता राव यांना मिळाली. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या निर्देशानुसार सिहोरा पोलिसांनी रेतीची विनापरवाना रेती वाहतूक करणाऱ्या टिप्पर क्र. एम. एच. 40 सीएम 8225 व टिप्पर क्र. एम. एच. 40 सीएस 7665 या वाहनावर कारवाई करून दोन्ही टिप्पर पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आले आहे. यावेळी विनापरवाना रेतीची चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी टिप्पर चालक व मालकाविरुद्ध सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रश्मिता राव यांच्या निर्देशानुसार सिहोरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार निलेश गोसावी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अमोल तांबे करीत आहेत.