जिल्हा प्रतिनिधी/ सतीश पटले
तुमसर तालुक्यातील चुल्हाड येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संचालक पदाची निवडणूक घेण्यात आली. ही संस्था 13 सदस्यीय असून या निवडणुकीत किसान एकता पॅनल व शेतकरी पॅनल असे दोन गट अमोरासमोर निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले होते. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था निवडणुकीत चुल्हाड, पिपरीचुन्नी, वारपिंडकेपार सुकळी, गोंडीटोला या गावातील 746 मतदारापैकी 634 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत किसान एकता पॅनलचे डॉ. अशोक पटले, देवेंद्र बाणेवार, बालचंद बोरकर, संजय पटले, रामकुवर सोनेवाने असे पाच उमेदवार विजयी झाले तर शेतकरी पॅनलचे जितेंद्र चौधरी, डॉ. जितेंद्र तुरकर, दिवाळू गुडेवार ,प्रमिला अंबुले, अनुबाई पटले, चिंधु पारधी, संजय राहंगडाले व राधेश्याम तुरकर असे आठ उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत निवडणूक अधिकारी सुधीर शेंद्रे, केंद्राध्यक्ष प्रशांत गुप्ता, डी. एन. कुंभरे यांनी विजयी उमेदवारांची घोषणा करताच विजयी झालेल्या उमेदवारांनी फटाक्याच्या आतिषबाजीत गुलाल उधळून जल्लोष साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांकडून नवनियुक्त विजयी उमेदवारांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.