वर्धा जिल्हा प्रतिनिधी : – गजानन पोटदुखे
दिनांक :- 12 फेब्रुवारी 2024
देवळी : देवळी तालुक्यात दोन दिवसापासून सतत गारपीट सह पाऊस पडत आहे . त्यामुळे शेतकऱ्याचे गहू, हरभरा, कापूसाचे, भाजीपाल्याचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हवालदील झालेल्या शेतकऱ्याला वादळी पावसाचा फार मोठा फटका बसलेला आहे. शासन कोणत्याही प्रकारची शेतकऱ्यांना त्वरित मदत करीत नाही. शेतकऱ्याच्या मालाला निर्धारित भावाने त्याच्या शेतमालाची खरेदी केल्या जात नाही याची दखल घेत,आणि शेतकऱ्याला नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून त्वरित प्रति हेक्टरी 50 हजार रुपये मदत आर्थिक मदत करण्यात यावी.या मागणी करिता युवा संघ मोर्चाचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि देवळी तालुक्यातील शेतकरी वर्ग यांनी देवळी तहसील मध्ये जाऊन अर्ध नग्न आंदोलन केले . देवळी तहसीलदाराला त्याबाबतची निवेदन सादर केले शासनाचे लक्ष केंद्रित केले . यावेळी देवळी तालुक्यातील शेतकरी आणि युवा वर्ग उपस्थित होते. शासनाने त्वरित यावर तोडगा न काढल्यास यापेक्षाही मोठे गंभीर स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला .