पक्षांचे घरटे झाले जंगलामधून लुप्त

0
20
1

प्रा. डॉ. कैलास व्हि. निखाडे , निर्सग अभ्यासक

भामरागड:- भामरागड  तालुका हा संपूर्ण जंगलाने व्यापलेला आहे. या जंगलामध्ये वेगवेगळया प्रकारचे वनस्पती दिसून येते. या जंगलामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात पक्षी दिसून येत होते. भामरागड मध्ये पर्लकोटा , इंद्रावती, पामुलगौतम, नदीचा संगम आहे. या नदीवर भरपूर मोठया प्रमाणात पक्षी पाणी पिताना दिसत होते. व उंच भरारी घेऊ आपल्या घरटंयात जात होते. रात्री पक्षाचा आवाज येत होता. जंगलामध्ये फिरत असतांना पक्षाची घरटे नष्ट होणयांच्या मार्गावर आहे. पुर्वी एका झाडाला 10 ते 12 घरटे दिसायची परंतु आता फक्त एकच घरट दिसत आहे.

याचा अर्थ की पक्षाची संख्या दिवसेें दिवस कमी होत असतांनी दिसत आहे. पुर्वी ही घरटे लहान मुले खेळायची परंतु आज विद्यार्थ्यांना पक्षाच्या घरटं पाहण्यासाठी सुद्धा दिसत नाही. पक्षाचे घरटे बनवण्यासाठी पक्षी फार मोठ्या प्रमाणात मेहनत करत असते. आपल्या तोंडात एक एक काडी आणून आपले घर विणत असते. उन्ह पाऊसा पासून आपले संरक्षण करीत असते. ते पक्षांचे घर आज आपल्याला पाहन्यास फारच कमी प्रमाणात दिसत आहे. पक्ष्यांचं जग मोठं रमनीयण् आकाशात विहरणारं स्वच्छंद आयुष्य मात्र अशा आयुष्यालाही विसावणारं घरकूल हवं असतं पक्ष्यांची घरटी हा कलाकुसरीचा अत्यंत सुंदर नमूना असतो  काडी काडी जमवून पक्षी स्वतः ही कलाकुसर करून ऊण पावसापासून रक्षण करणारं घरटं बांधतातय पण अलीकडे कृत्रिम घरटी करण्याचा एक नवाच प्रकार पाहायला मिळतो.
१९७० च्या सुमारास सुबाभूळ ही ब्राझिलमधून आयात केलेली वनस्पती लावायची लाट आली होती. तशी सध्या पक्ष्यांना वाचवण्याचं एक प्रतीक म्हणून पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी तयार करून ती झाडांवरए घरांवर खांबांवर कुंपणांवर लावायची एक लाट आली आहे. पक्ष्यांसाठी घरटी लावणं म्हणजे एनव्हॉयर्नमेंटवर टिक झाली. असा समज करून घेऊन केवळ व्यक्ती आणि संस्थां नाहीत तर राजकीय पक्षांनीही हा उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे. जुनी मोठी झाडं असलेल्या परिसरात आणि त्या झाडांना ढोल्या भोकं फटी आहेत अशा ठिकाणी घरटी लावली जात आहेत. खरं तर जिथे भरपूर झाडं आहेत तिथे घरटी लावण्याची आवश्यकता नाही   या उपक्रमातील सगळ्यात मोठी गोची म्हणजे घरटी लावण्याच्या आधी तिथे घरट्यांचा वापर करण्याची शक्यता असलेल्या पक्ष्यांच्या जाती अस्तित्वात आहेत की नाहीत इतकी साधी गोष्टही पहिली जात नाही. घरटी कोणत्या दिवशी लावली कुणी लावली कोणत्या झाडांवर लावली जमिनीपासून किती उंचीवर लावली वाऱ्यापावसाची दिशा बघून लावली की नाही.एकाच प्रकारची लावली की वेगवेगळ्या जातींच्या पक्ष्यांचे आकार आणि त्यांच्या गरजा ओळखून त्याप्रमाणे वेगवेगळ्या आकारांची आणि प्रकारांची लावली ;उदाण् पिंगळा नामक घुबडाला आकर्षित करण्यासाठी लावलेलं कृत्रिम घरटं राखी वल्गुली या चिमणींपेक्षा लहान आकाराच्या पक्ष्याला कोणत्याही परिस्थितीत उपयुक्त ठरणार नाही . किती घरट्यांचा पक्ष्यांनी प्रत्यक्ष उपयोग केला काही महिने उलटल्यानंतर घरट्यांची अवस्था कशी आहे. या महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार न करता किती घरटी लावली यावर प्रामुख्यानं भर दिला जातो. घरटी लावण्याच्या वेळेचा अभूतपूर्व उत्साह म्हणता म्हणता मावळत जातो. देखभाल आणि पाठपुराव्याच्या नावानं आनंदच असतो.
भामरागड जंगलामध्ये फिरत असताना जंगलामध्ये सुध्दा ही घरटे लुप्त होत चाललेली आहे. यांचाच अर्थ की पक्षांची सख्यां कमी होत चाललेली आहे.