माइकल मेश्राम
सालेकसा: प्रताप मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट गोंदिया द्वारा संचलित शंकरलाल अग्रवाल विज्ञान महाविद्यालय सालेकसा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना सात दिवसीय ग्रामीण विशेष शिबिर दि. 11 फेब्रुवारी 2024 ते 17 फेब्रुवारी 2024 या दरम्यान घेण्यात येणार आहे, या शिबिराची सुरुवात आणि उद्घाटनाचा कार्यक्रम दि.11 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एन. मूर्ती तर विशेष अतिथीपदी मा. रामेश्वरभाऊ कटरे सरपंच ग्रामपंचायत गोर्रे मा. पुरुषोत्तमजी बाबा कटरे सदस्य महाविद्यालय विकास समिती मा. नरसय्या कोंडागुर्ले तहसीलदार सालेकसा सौ. रामकलाबाई मरसकोल्हे उपसरपंच सौ सिंधुबाई खुळशिंगे सदस्य ग्रामपंचायत श्री. डी. एस. कुराहे मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा श्री. रमेश सोनवाने शिक्षक जिल्हा परिषद शाळा श्री. डी. एम. हरीणखेडे शिक्षक सौ पल्लवी बिसेन शिक्षिका कु. शितल सोनवणे शिक्षिका जिल्हा परिषद शाळा गोर्रे श्री.अशोक बिसेन पोलीस पाटील गोर्रे, श्री. मोतीरामजी चौधरी वन समिती अध्यक्ष, श्री. जयलालजी पटले सेवा सहकारी संस्था अध्यक्ष हे उपस्थित होते. यामध्ये सर्व अतिथींनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करून राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व पटवून दिले आणि राष्ट्रीय सेवा योजना हा तुमच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कशाप्रकारे उपयोगी आहे हे उदाहरणे देऊन समजावून सांगितले. या सर्व उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जी. व्ही. आडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ गिरीश देशमुख यांनी केले. या सर्व कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंद शिक्षकेतर कर्मचारी आवर्जून उपस्थित होते.